Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ मुद्द्यावर महाविकास आघाडीत खदखद; राष्ट्रवादी-शिवसेनेच्या धोरणावर काँग्रेसचे नेते आक्रमक..!

मुंबई : आरक्षण हा सध्याच्या राजकारणात सामाजिक मुद्दा न राहता कळीचा मुद्दा बनला आहे. देशातील सर्वांनाच आरक्षण हवे असल्याने आता यापासून कोणीही वंचित न राहण्याचे अभियान जोमात आहे. वाढते शैक्षणिक शुल्क आणि जीवघेणी स्पर्धा यामुळे आरक्षणाचा मुद्दा अनेकांसाठी जीव की प्राण बनलेला आहे. त्यातच नोकरी मिळूनही पुढे सगळीकडे पदोन्नतीचा लाभ मिळण्यासाठीची संधी महाविकास आघाडी सरकारने काढून घेतल्याने मागासवर्गीय नोकरदार घटक नाराज आहेत. त्यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये दुफळी माजण्याची शक्यता आहे.

Advertisement

पदोन्नतीतील आरक्षण कायम राहण्यासाठी कॉंग्रेस नेते आणि वीजमंत्री ऊर्जामंत्री नितीन राऊत आग्रही आहेत. त्यांनी हा मुद्दा जाम तापवल्याने सरकारच्या तिन्ही घटक पक्षातील संवादाला ब्रेक लागला आहे. तर, मराठा समाजाला न दुखवून आताच्या कठीण काळातून मार्ग काढण्यासाठी मराठा आरक्षणाचा मुद्दा बाजूला सारून वेळ मारून नेण्याचे धोरण राष्ट्रवादी आणि शिवसेना या घटक पक्षांचे आहे. त्यामुळे आता यावरून सुरू असलेली खदखद मिटणार की कॉंग्रेस सत्तेबाहेर पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Loading...
Advertisement

काँग्रेसचे मराठा नेते पदोन्नतीतील आरक्षणाच्या भूमिकेवर मौन बाळगून असतानाच पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या अनुसूचित जाती राष्ट्रीय सेलचे अध्यक्ष असलेले राऊत हे विदर्भातील काँग्रेसचा दलित चेहरा आहेत. तर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे ओबीसी असून इतर मागास प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश त्यांनाही नको आहे. परिणामी कॉंग्रेसमध्ये मराठा विरुद्ध इतर समाजाचे नेते असे राजकारण पेटले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply