Take a fresh look at your lifestyle.

अर्थसाक्षरता : वाचा ‘पीएफ’च्या ऑनलाइन अर्जाबाबत ही महत्वाची माहिती

मुंबई : करोना संकट काळात देशासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. या काळात देशाच्या आणि राज्यांच्या अर्थव्यवस्थांना मोठा फटका बसला आहे. नागरिकांचेही खूप हाल झाले. या संकटात लाखो नागरिकांच्या नोकऱ्या गेल्याने त्यांना आता आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. काही जणांचे जमा केलेले पैसे सुद्धा आता संपले आहेत. त्यामुळे अनेकांनी नाईलाजाने पीएफ (PF / Provident Fund Money) खात्यातील रक्कम काढण्यासाठी अर्ज केले आहेत. ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले असले तरी यामध्ये अनेक गोष्टी लोकांना माहिती नाहीत, त्यामुळे एखाद्या अगदी छोट्याशा चुकीमुळे देखील अर्ज रद्द होण्याची शक्यता असते. चला तर मग आपण पाहूया की पीएफ खात्यातून पैसे काढताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे.

Advertisement

पण ज्या वेळी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करतो त्यावेळी या अर्जासोबत काही महत्वाची माहिती देणे आवश्यक असते. अर्ज केल्यानंतर एक ब्लँक चेक किंवा पासबुकचा फोटो स्कॅन करुन अपलोड करावा लागतो. यावेळी विशेष काळजी घ्यावी लागते. चेक किंवा पासबुकवर आपले नाव, खाते नंबर आणि बँकेचा आयएफएससी कोड व्यवस्थित दिसत नसेल तर आपला अर्ज रद्द होऊ शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खातेदाराचा युएएन नंबर (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) आधार कार्डशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे.

Advertisement

पीएफसाठी अर्ज केल्यानंतर अर्जासोबत काही कागदपत्रे जोडावी लागतात. ही महत्वाची कागदपत्रे पीडीएफ स्वरुपात स्कॅन करुन पाठवावी लागतात. त्यामुळे याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे. काही वेळेस बँकांचे खाते क्रमांक ११ आकडी असतात. त्यामुळे अडचण निर्माण होऊ शकते. कारण पीएफओ कडून बराच वेळेस अशी प्रकरणे नाकारली जात असल्याचे समोर आले आहे. लक्षात ठेवा की अर्ज करताना तुम्ही जी काही माहिती द्याल, ती अचूक असणे महत्वाचे आहे. माहितीत तफावत आढळल्यास देखील अर्ज रद्द होऊ शकतो.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply