Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. महाराष्ट्रीयनांच्या डोक्यावर आहे ‘इतके’ कर्ज; व्याजापोटी द्यावे लागतात हजारो कोटी

मुंबई :

Advertisement

राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध झालेला आहे. मागि वर्षभरात करोना संकटात प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रावर कर्जभार वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील प्रत्येक व्यक्तीवर त्यामुळे कर्जभार वाढला आहे.

Advertisement

राज्याला या आर्थिक वर्षात व्याजापोटी ३५,५३१ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. राज्यात दरडोई २ लाख ३२ हजार २७० रुपये कर्जाचे प्रमाण आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये राज्यावर ४ कोटी ७१ लाख ६४२ रुपये एवढे कर्ज होते, असे अहवालात म्हटलेले आहे.

Advertisement

आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये राज्यावर ५ कोटी २० लाख ७१७ कोटी रुपये कर्ज भार अपेक्षित आहे. याचे स्थूल राज्य उत्पन्नाशी प्रमाण १९.६ टक्के आहे. राजकोषीय धोरणाच्या निकषातील २५ टक्के मर्यादेपेक्षा ते आटोक्यात असल्याचे अहवालात म्हटले आहे. 

Advertisement

राज्याचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत सादर केला. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. राज्यात कृषी वगळता इतर सर्वच क्षेत्रात नकारात्मक स्थिती आहे. विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र यंदाही पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. गुजरात, कर्नाटकानंतर थेट विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. दरडोई उत्पन्नातही हरियाणा, तेलंगण, कर्नाटक, तामिळनाडूनंतर महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर आहे. 

Loading...
Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply