Maharashtra Weather : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतेक भागात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना देखील अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तर काही ठिकाणी कडक उन्हाळा पाहायला मिळत आहे.
अनेक शहरात आता तापमान चाळीस अंशांच्यावर जाताना दिसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागात सध्या कमाल तापमान 39 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे तर मालेगावसह अकोला, यवतमाळ, सोलापूर आणि ब्रह्मपुरीमध्ये देखील तापमानाने चाळीशी ओलांडली आहे.
ग्राहकांना होणार फायदा! बाजारात येत आहे ‘ह्या’ 3 शानदार कार्स
तर दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही ठिकाणी पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. विभागानुसार विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होऊ शकते. या भागात केवळ पाऊस नाहीतर येथे गडगडाटी वादळासह गारपीट होण्याची देखील शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. विभागानुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे हा पाऊस पडू शकते.
तर देशातील पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा, सिक्कीम, पूर्व झारखंड, छत्तीसगड पूर्व विदर्भ आणि अरुणाचल प्रदेशांमध्ये पुढील 24 तासांत अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
गाझामध्ये पुन्हा येणार शांतता? रमजानमध्ये युद्धबंदीचा ठराव मंजूर! वाचा सविस्तर
विभागाने दिलेल्या माहितीनुसार या भागात विजांच्या कडकडाटासह वादळ, जोरदार वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हे जाणून घ्या कि, 26 मार्च ते 29 मार्चदरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर 29 मार्चला छत्तीसगड, पूर्व झारखंड, पश्चिम बंगाल, पश्चिम आणि उत्तर ओडिशामध्ये गडगडासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.