Maharashtra Rain । राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. आजही भारतीय हवामान खात्याकडून विविध जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
जरी राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस सुरु झाल्याने काही ठिकाणी पावसाची प्रतिक्षा कायम आहे. मुंबई, पुण्यासह कोकण आणि विदर्भात पावसाने सरासरी ओलांडली असून राज्यातील एकूण १७ जिल्ह्यांमध्ये सरासरी पाऊस झाला आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये पूर आला आहे. पुरामुळे धरणांचे दरवाजे उघडले आहे. कोल्हापूरमधील पंचगंगा नदीची पाणी पातळी 39 फुटांवर आली आहे.
पावसाचा जोर वाढणार
दरम्यान, कोकणात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. काजळी नदी 17 मीटरवर, गोदावरी नदी 7 मीटर, मुचकुंदी नदी चार मीटर आणि जगबुडी 6.85 मीटरवर आहे. काजळी नदीचे रौद्ररूप अजूनही कायम असून सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील धरणे भरली आहेत.
सरासरी गाठलेल्या जिल्ह्यांची यादी :
पुणे, पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, जालना, नांदेड, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांत पावसाने सरासरी गाठली आहे.
सरासरी ओलांडलेल्या जिल्ह्यांची यादी :
बीड, लातूर, परभणी, धुळे, सिंधुदुर्ग, सांगली, अहमदनगर, जळगाव, बुलडाणा, अकोला, वाशीम आणि यवतमाळ. तेथे सरासरीच्या तुलनेत २० ते ५९ टक्के पावसाची नोंद झाली आहे.