Maharashtra Rain Update : नागरिकांनो सावधान,! राज्यातील ‘या’ भागात आज मुसळधार पाऊस, यलो जारी

Maharashtra Rain Update : राज्यात झपाट्याने बदलत असणाऱ्या वातावरणामुळे आता राज्यात मान्सूनसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे यामुळे येत्या काही दिवसात राज्यात  मान्सूनचा आगमन होणार असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

तर दुसरीकडे मान्सूनपूर्वी आज राज्यातील बहुतेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

या भागात जोरदार पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि विदर्भातील काही भागात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे आज भारतीय हवामान विभागाने या भागात यलो अलर्ट देखील जाहीर केला आहे.

बुलढाणामध्ये वादळी पाऊस, पिकाचं मोठं नुकसान

राज्यातील बहुतेक भागात काही मान्सूनपूर्वी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले बुलढाणा जिल्ह्यात जिल्ह्यातील संगमपुर परिसरात काल रात्री झालेल्या वादळी पावसामुळे केळी पिकाचं मोठं नुकसान झाले आहे.

Leave a Comment