Maharashtra Rain Alert : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे.
या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना देखील दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे राज्यातील काही भागांना आता देखील पावसाची प्रतीक्षा आहे.
यातच भारतीय हवामान विभागाने येत्या काही दिवसांसाठी अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा ‘ऑरेंज अलर्ट
भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि पुण्यासह पाच जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. पावसामुळे अनेक शहरांतील लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.
पुणे, मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांसाठी कोणताही इशारा नाही.
याशिवाय कोकणात पावसाचा जोर आणखी वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मध्य भारतावर कमी दाबाचे क्षेत्र विकसित झाल्यामुळे राज्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकण आणि घाटात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर उर्वरित राज्यात हलका पाऊस सुरू राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
महाराष्ट्रात पावसाळा सुरू झाल्याने शेतकऱ्यांना सर्वाधिक दिलासा मिळाला आहे. आज सकाळपासूनच विविध जिल्ह्यांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला.
दिवसभर ढगाळ वातावरण होते. मुंबई आणि परिसरात पुढील तीन दिवस अधूनमधून हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.