Maharashtra Poltics । पुन्हा सत्तांतर होणार? अजितदादा होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, राजकीय वर्तुळात हालचालींना वेग

Maharashtra Poltics । मागील काही दिवसांपासून राज्याचे राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येतात. यामुळे अनेकदा राज्याचे राजकारण एका वेगळ्याच वळणाला जाते. अशातच आता राज्यात पुन्हा सत्तांतर होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

कारणही काहीस वेगळं आहे. आज राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने पदाधिकारी, कार्यकर्ते या दोन्ही नेत्यांवर शुभेच्छांचा वर्षाव करीत असून ठिकठिकाणी त्यांच्या वाढदिवसांचे बॅनर्स लागले आहेत. अशातच नाशिक शहरात लागलेल्या बॅनर्सने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. कारण या बॅनर्सवर अजित पवार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा मजकूर छापला आहे.

संपूर्ण शहरात ही बॅनरबाजी केली असून यावरुन आता महायुतीत पुन्हा वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साथ सोडून महायुतीत सहभागी झालेले अजित पवार लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी ही इच्छा उघडपणे बोलून सुद्धा दाखवली आहे.

अजित पवार हे महाराष्ट्रात सर्वात जास्त वेळा उपमुख्यमंत्री म्हणून राहिलेले नेते आहेत. आता आगामी विधानसभा निवडणुकीनंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे, असं अनेकांचं मत आहे. अजित पवार यांची प्रशासकीय यंत्रणेवर चांगलीच पकड असल्याने ते राज्याच्या कारभार व्यवस्थित सांभाळून शकतात, असा अनेकांचा दावा आहे. यावर आता महायुती कशाप्रकारे प्रतिक्रिया देते? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Leave a Comment