Maharashtra politics update: राणे-राऊतांमध्ये पडली ठिणगी; पालकमंत्र्यांना केली “ती” विचारणा
Maharashtra politics update: मुंबई(Mumbai) : सिंधुदूर्ग(Sindhudurg) जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत संघर्षाचं चित्र पाहायला मिळाले. ठाकरे गटातील खासदार विनायक राऊत(Vinayak Raut) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याने तणाव निर्माण झाला होता.
नेमकं काय घडलं:
सभेच्या अजेंड्यानुसार बैठक चालावी असं नारायण राणे यांचं म्हणणं होतं. दरम्यान विनायक राऊत यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारचा मुद्दा मांडला. मागील सरकारने घेतलेले सर्व निर्णय सध्याच्या सरकारने रद्द केले असून, त्यावर विचार व्हावा असं ते म्हणाले. नारायण राणे यांनी यावेळी मध्यस्थी करत अजेंड्यावर असणारे विषय आधी घेऊयात असं सांगितलं. त्यावर विनायक राऊत यांनी आक्षेप घेतला. यावर विनायक राऊत यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण(Ravindra chavhan) यांना ‘ही बैठक नेमकं कोण चालवत आहे?’अशी विचारणा केली.
must read
- Maharashtra Politics : “हम बेवफा हरगीज ना थे! पर हम वफा कर ना सके”, असे गात सुप्रिया सुळेंची भाजपवर टीका
- Pumpkin recipe :भोपळ्याची भाजी आरोग्यासाठी आहे फायदेशीर, “अशा” पद्धतीने बनवा की प्रत्येकजण रेसिपी विचारेल
- ICC T20 World Cup 2022 Shahid Afridi: आता ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरने भारताविषयी केले बेताल वक्तव्य; पहा काय आहे प्रकरण
एकीकडे शिंदे गट आणि भाजपा (BJP) दुसरीकडे ठाकरे(Thakareay) गट असं चित्र निर्माण झालं आहे. दोन्ही बाजूंनी सतत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरु असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. याचा प्रत्यय आज आला. दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ शाब्दिक चकमक सुरु होती. यामुळे बैठकीत काही वेळासाठी तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं.