Maharashtra politics । राज्यात महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले. महाविकास आघाडीचा घटकपक्ष असणाऱ्या काँग्रेसला सर्वात जास्त जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. असे असल्याने काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळविण्यावर लक्ष केंदित केले आहे.
आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाचे एक गिफ्ट दिले आहे. शिंदे यांनी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच ठाण्यात पक्षाला भलं मोठं भगदाड पाडले आहे. ठाण्यातील युवासेनेच्या अनेक पदाधिऱ्यांनी ठाकरे यांना रामराम ठोकत शिंदे गटाचे धनुष्यबाण हाती घेतले आहे.
एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नंदनवन निवासस्थानी ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना शिवसेनेत पक्षप्रवेश सोहळा पार पडला.दरम्यान शिंदे गटात प्रवेश करण्यापूर्वी युवासेना पदाधिकारी यांनी आदित्य ठाकरे यांना एका पत्र पाठविले होते. या पत्रात त्यांनी ”गेली 15 वर्ष सातत्याने युवासेनेच्या स्थापनेपासून युवकांचे संघटन ठाण्यात मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे आणि एकनिष्ठेने आम्ही दिवसरात्र काम करत होतो. प्रसंगी विरोधकांना अंगावर घेतले. पण मागील 2 वर्षात काही निवडक पदाधिकारी यांनी चालू केलेल्या अंतर्गत गटबाजीमुळे आमच्या निष्ठेवर प्रश्न उपस्थित केले असल्याने आम्ही जडअंतकरणाने सामुहिकरित्या पदांचा राजीनामा देत आहे.” असे म्हटले आहे.
ठाणे शहर ठाकरे गटाचे युवा सेनेचे शहर अधिकारी किरण जाधव, उपजिल्हाप्रमुख अर्जुन डाभी, बाळकूम शाखा प्रमुख अभिषेक शिंदे, शहर उपसमन्वयक दीपक कनोजिया आणि खोपट विभाग अधिकारी राज वर्मा यांच्यासह अनेक युवासेना कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.