Maharashtra Politics: पुन्हा राजकीय भूकंप, शिंदे गटाला लागणार धक्का, आमदार उद्धव गटाच्या संपर्कात?

Maharashtra Politics: लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप येणार असल्याची शक्यता राजकीय पंडितांकडून वर्तवली जात आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला जबरदस्त फटका बसल्याने आता अनेक आमदार पक्ष बदलण्याची तयारी करत असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अनेक आमदार शरद पवार गटाचे संपर्कात असल्याची माहिती कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दिल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे.

पुढील 15 दिवसात अनेक आमदार शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती तर आता शिंदे गटातील काही आमदार उद्धव ठाकरे गटाचे संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 शिंदे गटातील काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी कोणते आमदार कोणत्या पक्षात जाणार आहे पाहावा लागेल.

तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी एनडीएमध्ये सामील होण्याचा दावा फेटाळला आहे. इंडीया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे उपस्थित न राहिल्याने ते एनडीए मध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होती मात्र त्यांनी आता हा दावा फेटाळून आपण इंडिया आघाडीमध्ये राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले नाही आणि आगामी विधानसभा निवडणुका पाहता भाजपला मित्रपक्षांना एकत्र ठेवायचे आहे. सूत्रांच्या हवाल्याने राष्ट्रवादी (अजित पवप) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांनाही प्रत्येकी एक मंत्रीपद दिले जाईल, असा दावा केला जात आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मित्रपक्षांसोबत पुढे जायचे आहे. मात्र, मंत्रिमंडळाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतरच या सर्व अटकळांना पूर्णविराम मिळेल.

Leave a Comment