Maharashtra Politics । लोकसभेनंतर राज्यातील सर्व राजकीय पक्ष विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. लोकसभेनंतर आता अवघ्या काही महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. लोकसभेत महाराष्ट्रात महायुतीला महाविकास आघाडीकडून पराभव सहन करावा लागला होता. पराभवामुळे आता महायुती आगामी निवडणुकीच्या तोंडावर चांगलीच तयारीला लागली आहे.
राज्यातील राजकारणात रविवारी दोन मोठ्या घडामोडी झाल्या. लोकसभा निवडणुकीतील दमदार यशानंतर आता महाविकास आघाडीत इनकमिंग सुरु झाले आहे. छत्रपती संभाजीनगरात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे भाजपला धक्का देत आहेत तर नाशिकमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का देत आहे.
नाशिकचे अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस नानासाहेब महाले आज शरद पवार गटात प्रवेश करत आहे. तर त्यांच्यासोबत तब्बल १०० पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याने अजित पवार यांना नाशिक जिल्ह्यात हा मोठा धक्का आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला १० पैकी आठ जागा मिळाल्या. शरद पवार गटाने दहा जागा लढवल्या होत्या. पण अजित गटाला एकच जागा मिळाली. नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना भाजपने उमेदवारीसाठी दूर ठेवले होते. असे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे.
तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरात उद्धव ठाकरे भाजपला धक्का देत आहे. भाजप नेते आणि उपमहापौर राजू शिंदे भाजपसोडून शिवसेनेत जात आहे. त्यांच्यासोबत इतर नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या गटात जात आहेत. तसेच अनेक पदाधिकारी आहे. गोकुळ मलके (नगरसेवक भाजप), प्रल्हाद निमगावकर (नगरसेवक भाजप), अक्रम पटेल (नगरसेवक राष्ट्रवादी), प्रकाश गायकवाड ( नगरसेवक अपक्ष), रुपचंद वाघमारे (नगरसेवक अपक्ष) हे ठाकरे गटात जात आहेत.