Maharashtra Politics : नुकतंच लोकसभा निवडणुका पार पाडले असून. या निवडणुकीत एनडीएला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळाला आहे मात्र 2019 च्या तुलनेत एनडीएच्या जागा कमी झाले आहे.
तर दुसरीकडे भाजपला देखील या निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. 2019 मध्ये 303 जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी फक्त 240 जागा मिळाले आहे.
याचे अनेक कारण असले तरी सर्वात महत्वाचा कारण गेल्या 10 वर्षात सत्तेत आल्यापासून दलित, ख्रिश्चन आणि मुस्लिम समूहातील नागरिकांवर झालेले हल्ले, अन्याय आणि अत्याचाराच्या अनेक घटना, तसेच भाजप – एनडीए गठबंधन यांचे वारंवार संविधान बदलण्याची घोषणा आणि त्यादिशेने वाटचाल या सर्व बाबींमुळे दलित, वंचित, ख्रिश्चन आणि मुस्लिम समूहातून इंडिया आघाडीला झालेलं मतदान कारणीभूत आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत एक बाजूला दलित, वंचित, ख्रिश्चन आणि मुस्लिम समाज भाजप – एनडीए गठबंधनला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मतदान करतो आणि दुसरी कडे महाराष्ट्रात महाविकास आघाडी 48 लोकसभा क्षेत्रात एकही मुस्लीम उमेदवार देत नसून यांना फक्त समजाचे मत पाहिजे असा आरोप अहमदनगर AIMIM चे जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार दिला नसला तरी मुस्लीम समाजाने महाविकास आघाडीला संविधान वाचवण्यासाठी आणि भाजप- एनडीए सरकारला सत्तेतून रोखण्यासाठी भरभरून मतदान करून मविआचे जास्तीत जास्त उमेदवार लोकसभेत पाठवले. मुस्लीम समाजाला हि अपेक्षा होती की येणाऱ्या विधानपरिषद आणि विधानसभामध्ये महाविकास आघाडी मुस्लिमांना उमेदवारी देऊन मुस्लीम समाजाचा प्रतिनिधी निवडून देतील.
परंतु ज्या प्रकारे विधानपरिषद निवडणुकीत मविआने एकही मुस्लीम उमेदवार दिला नाही. जे दोन होते त्यांना पण डावलले. त्यावर स्पष्ट दिसते की मविआ आघाडीला मुस्लिमांचे मते पाहिजे त्यांचा प्रतिनिधी नको. याचाच अर्थ लोकसभा निवडणुकीत मुस्लीम मतांचा स्वताच्या सत्ते साठी मविआ ने वापर करून घेतले आणि मुस्लिमांना प्रतिनिधत्व न देता मुस्लिमांना धोका दिला असल्याचा आरोप AIMIM जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी केला.
एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी पत्रकारानंशी बोलत असतांना सांगितले की “यावेळीच्या निवडणुकीत मुस्लिम समूहाला देशात मोदीचं सरकार नको होतं. तसेच अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 3 वर्षात मुस्लिमांवर झालेले हल्ले, धार्मिक स्थळांची विटंबना , दर्ग्यात मूर्ती बसवणे, मशीदीवर हल्ले होऊन आरोपीवर कारवाई नाही, मुस्लीम तरुणाची हत्या, मुस्लीम समाजाचा गावात आर्थिक बहिष्कार जे आज ही चालू आहे. यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील जनतेने जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघात मविआला भरभरून मतदान केले.
परंतु विधान परिषदेत एकही मुस्लीम उमेदवार न दिल्याने मुस्लीम समाजात नाराज झाले असून येणाऱ्या विधानसभेत मविआ मुस्लीम समाजाला न्याय देईल याची शक्यता कमी दिसते. विधानसभामध्ये ही मुस्लीम , दलीत, वंचित, ख्रिश्चन समाजाचा मतांसाठी वापर होईल याची शक्यता नाकारता येत नाही.
“इंडिया आघाडीच्या नेत्यांना निवडून देण्यासाठी मुस्लिम संघटना, धर्मगुरू आणि नेत्यांनी बरेच प्रयत्न केले, कोणताही मोबदला न मागता कष्ट केले. महाराष्ट्रात काही मशिदीतून मुस्लिम धर्मगुरूंनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी आवाहन केला होता. त्यामुळे आणि इतर अनेक लोकांच्या प्रयत्नांमुळे महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जागा जिंकता आल्या,” इतके करूनही समाजाला न्याय मिळेत नसेल तर समाजाने मविआ सोबत जायचे कशाला? असा प्रश्न डॉ परवेज अशरफी यांनी केला.
देशात मुस्लिमांची लोकसंख्या 15 टक्के असताना लोकसभेत फक्त 24 खासदार
“काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नेहमीच दुटप्पी राहिले आहे. त्यात विधान परिषदेच्या निवडणुकीत मुस्लिम आमदारांच्या दोन रिक्त झालेल्या जागादेखील काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं यावेळी त्यांना परत दिल्या नाहीत, याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करण्यासाठी राजीनामा देखील दिला. तरीसुद्धा महाविकास आघाडीच्या कोणत्या नेत्यानं त्यांच्या राजीनाम्याची दखल देखील घेतली नाही. असा आरोप अशरफी यांनी केला.
आता येत्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मविआ मुस्लीम, दलीत, वंचीत, ख्रिश्चन समाजाला परत भाजप आणी एनडीएची भीती दाखून मत मागतील परंतु सत्तेत भागीदारी देतील याची शास्वती कोणीही देणार नाही त्यामुळे मुस्लीम, दलीत, वंचीत, ख्रिश्चन समाजाने आता ठामपणे आपली भूमिका मांडवी की आमच्या समाजाला उमेदवारी देऊन निवडून आणायची शास्वती मविआ ने द्यावी अन्यथा समाजाने आपली चूल स्वतंत्र पेटवावी असे डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले.
लवकराच येणाऱ्या विधानसभा संदर्भात समस्त मुस्लीम समाजाची एक बैठक होणार असल्याचे संकेत डॉ परवेज अशरफी यांनी दिले.