Maharashtra Politics: भेसळयुक्त दुध आढळुन आल्यास…, अन् विखेंनी दिला अधिकाऱ्यांना इशारा

Maharashtra Politics: राज्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांना जर संघाने तीस रुपये दर न दिसल्या त्यांच्यावर कारवाई करा असा आदेश आता राज्य सरकारने दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सध्या राज्यात दुधातील भेसळ रोखण्यासाठी राज्य सरकारकडून उपाय योजना सुरू आहे तसेच येणाऱ्या दुध संकलन केंद्राची संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी अचानक तपासणी करावी असे आदेशही सरकारने दिले आहे. याच बरोबर जर भेसळयुक्त दुध आढळुन आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करा असे आदेश देखील राज्याचे महसूल आणि पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री विखे पाटील यांनी दिले आहे. 

अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या   बैठकीस जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  

यावेळी मंत्री विखे पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील प्रत्येक दुध संकलन केंद्रावर उच्चप्रतीच्या दुधाचे संकलन करण्यात यावे. दुधाच्या गुणवत्तेमध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड स्वीकारली जाणार नाही.  जिल्ह्याचा उत्तर व दक्षिण विभागामध्ये दुधाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी पथक गठित करण्यात येऊन त्यांच्यामार्फत दुधाची तपासणी करण्यात यावी. तपासणीमध्ये दुधामध्ये भेसळ आढळुन आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी. असे आदेश देखील यावेळी मंत्री विखे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

तसेच दुधसंकलन केंद्रावर दुध देणाऱ्या शेतकऱ्यांना 30 रुपये प्रतीलिटर दर देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. जे केंद्र शेतकऱ्यांना 30 रुपयांचा दर देणार नाहीत, त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचे निर्देशही या बैठकीत विखे यांनी दिले आहे.

Leave a Comment