Maharashtra Politics : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात (Maharashtra Politics) उद्धव ठाकरे गटाने उमेदवाराची घोषणा केली आहे. काल उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) पत्रकार परिषदेत सत्यजित पाटील यांना उमेदवारी घोषित केली. याआधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना य (Raju Shetti) मतदारसंघातून उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होती. परंतु या चर्चा प्रत्यक्षात उतरल्या नाहीत. यामागे काही कारणे होती. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत राजू शेट्टी यांनी आम्ही केलेली विनंती मान्य केली नाही त्यामुळे उमेदवार देण्याचा निर्णय घेतला असे सांगितले होते. यानंतर राजू शेट्टी यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली होती.
राजू शेट्टी मध्यमांशी बोलताना म्हणाले, की संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत आम्ही स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आम्ही मागील तीन ते चार वर्षांपासूनच तयारी सुरू केली होती. परंतु संघटनेतील काही सदस्यांचे असे मत होते की महाविकास आघाडीचा पाठिंबा घ्यावा. तर दुसरीकडे हातकणंगले मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडणार अशी वक्तव्य महाविकास आघाडीचे नेतेमंडळी करत होती. या मतदारसंघात उमेदवार देऊ नका अशी मागणी करत मी दोन वेळा उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
Parbhani Lok Sabha : परभणीत मोठ्ठा ट्विस्ट! वंचितने उमेदवार बदलला; हवामान अभ्यासकच मैदानात
Maharashtra Politics
यावर लवकरच निर्णय घेतला जाईल असे त्यावेळी सांगण्यात आले होते. परंतु पुढे काय झाले याबद्दल मला माहिती नाही. यानंतर मला निरोप आला की तुम्ही मशाल चिन्हावर निवडणूक लढा. परंतु मशाल चिन्ह हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहे आणि हे चिन्ह घेऊन जर निवडणूक लढवायची म्हटले तर त्यांच्या पक्षात प्रवेश केल्यासारखेच होते. मी आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षात काम केलेले नाही. निवडणूक लढता यावी यासाठीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे स्थापना केली होती.
मी याआधी अनेक निवडणुका लढल्या आहेत. परंतु आता वैयक्तिक स्वार्थासाठी शेतकरी आणि संघटनेला वाऱ्यावर सोडू शकत नाही. त्यामुळे मी मशाल चिन्हावर निवडणूक लढवू शकत नाही असे ठाकरे गटाला कळवले होते. त्यामुळे आता जरी ठाकरे या मतदारसंघात उमेदवार जाहीर केला असला तरी आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवणार आहोत, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली.
Maharashtra Politics
दरम्यान या मतदारसंघात सत्यजित पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी देखील आपली भूमिका आज स्पष्ट केली. सतेज पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले की हातकणंगलेची जागा ठाकरे गटाची होती आणि त्यांनीच तो निर्णय घेणे अपेक्षित होते. राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा सुरू होती मात्र या चर्चेला अंतिम स्वरूप मिळाले नाही. या जागेवर त्यांनी उमेदवार जाहीर केला आता आम्ही महाविकास आघाडी म्हणून पुढे जाऊ.निवडणुकीसाठी पुढील रणनीती ठरवू.
Osmanabad Lok Sabha : धाराशिवचा उमेदवार ठरला! भाजप आमदाराच्या पत्नीला राष्ट्रवादीनं दिलं तिकीट..
राजू शेट्टी आमच्याबरोबर असावेत ही आमची प्रामाणिक भूमिका होती. ही जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वाट्याला आली होती. परंतु ही जागा जर काँग्रेसकडे असती तर आम्ही सर्वांना विचारून त्वरित निर्णय घेतला असता. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि ठाकरे गटाचा साखरपुडा झाला मात्र लग्न जमलं नाही. यामुळे आता आगामी काळात मतविभागणीचा फटका कोणाला बसेल हे आताच सांगता येणार नाही. परंतु या मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकद मोठी आहे आता त्यानुसार पुढील रणनीती ठरवू, अशी प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी दिली.
Maharashtra Politics