Maharashtra Politics: आज दुपारी 3 वाजता केंद्रीय निवडणूक आयोग आगामी लोकसभेच्या तारखा जाहीर करणार आहे मात्र आतापर्यंत राज्यातील सत्ताधारी महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायमच असल्याचा चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार सत्ताधारी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. माहितीनुसार, भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात राज्यातील 48 पैकी 42 जागांवर समझोता झाला आहे. पण हे प्रकरण लोकसभेच्या सहा जागांवर अडकले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजप 25, शिवसेना 11 आणि राष्ट्रवादी 7 जागांवर निवडणूक लढवणार आहे. ज्या सहा जागांची चर्चा आहे, त्यापैकी काही जागा राज ठाकरेंच्या मनसेला दिल्या जाऊ शकतात, अशी माहिती आहे. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे महायुतीत सामील होण्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसून त्यावर मंथन सुरू आहे.
सरकारची मोठी कारवाई, 18 OTT प्लॅटफॉर्म अचानक ब्लॉक; ‘हे’ आहे कारण
लोकसभेच्या कोणत्या जागांवर कोण निवडणूक लढवणार यावर महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे. आता केवळ सहा जागांवर चर्चा सुरू आहे. चर्चेत असलेल्या सहापैकी काही जागा मनसेला दिल्या जाणार असल्याचे वृत्त आहे. मनसेचे बळ मिळाल्यानंतर लोकसभा निवडणुकीत महायुतीला धार मिळेल, असे सांगितले जात आहे. याशिवाय महायुतीसोबत गेल्याने मनसेची ताकदही वाढणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी (मनसे) युतीबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, याबाबत मी आत्ता अधिकृतपणे काहीही बोलू शकत नाही, बरीच चर्चा सुरू आहे, पण निर्णय कधी होईल ते सांगेन. महायुतीतील जागावाटपाबाबत विलंब नाही, लवकरच महायुतीचे सर्व उमेदवार जाहीर करू.
भाजप राज्यात एकूण 25 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे जाणून घ्या कि, राज्यात आतापर्यंत भाजपने 20 जागांवर उमेदवार जाहीर केले असून आता फक्त पाच जागांवर उमेदवारांची घोषणा व्हायची आहे.
महागाईत घरी आणा स्वस्तात मस्त कार! 5 लाखात मिळणार ‘ह्या’ जबरदस्त कार्स
उर्वरित जागा भाजप आपल्या समर्थकांना देणार असल्याचे वृत्त आहे. यामध्ये दक्षिण मुंबई आणि गडचिरोलीच्या जागांचाही समावेश आहे. अमरावतीची जागा नवनीत राणा यांच्यासाठी सोडली जाणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे.