Maharashtra Politics । अजित पवार गटाच्या आमदाराचा अजब दावा, म्हणाले; “शरद पवारांच्या खासदाराला आम्ही निवडून आणलं”

Maharashtra Politics । लोकसभेनंतर राज्यातील सर्व राजकीय पक्ष विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. लोकसभेनंतर आता अवघ्या काही महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. लोकसभेत महाराष्ट्रात महायुतीला महाविकास आघाडीकडून पराभव सहन करावा लागला होता. पराभवामुळे आता महायुती आगामी निवडणुकीच्या तोंडावर चांगलीच तयारीला लागली आहे.

अशातच आता राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले. जरी लोकसभा निवडणुकीत दोन्ही गटांनी एकमेकांसमोर उमेदवार उभे राहिले असले तरी यात शरद पवार यांच्या पक्षाने बाजी मारली. विशेष म्हणजे अनेक मतदारसंघात अजित पवार यांच्या पक्षातील उमेदवारांचा पराभव झाला.

अशातच आता शरद पवार यांच्या पक्षातील एका खासदाराला दुसऱ्या निवडणुकीत निवडून आणण्यासाठी चक्क अजित पवार गटाच्या आमदाराने प्रयत्न केला असल्याचे समोर आलं आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

नुकतीच लोणावळ्यातील कार्ला आई एकविरा देवी ट्रस्टच्या विश्वस्त पदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शरद पवार गटाचे भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे या उभे होते. त्यांची या पदावर त्यांची वर्णी लागावी यासाठी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके मैदानात उतरले होते.

या निवडणुकीत एकूण ७ सदस्यांमधील शेळके यांच्या ५ समर्थकांनी खासदार म्हात्रे यांना मतदान केलं असल्याची कबुली शेळके यांनी दिली आहे. आम्ही स्वतंत्र पक्षात आहोत. पण आमचे प्रेम वेगळे आहे. मी खासदार सुरेश म्हात्रे यांना शब्द दिला होता. तो पाळला, असं शेळके यांनी म्हटलं आहे.

Leave a Comment