Maharashtra Politics । बिग ब्रेकिंग! ठाकरे गटाच्या तब्बल ‘इतक्या’ प्रमुख पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, नेमकं कारण आलं समोर

Maharashtra Politics । राज्याचे राजकीय वातावरण सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून वेगळ्या वळणावरून जात असते. सत्ताधारी आणि विरोधक सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून आमनेसामने येत असतात. सध्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे.

नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या २४ प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. टोलनाक्यावर आंदोलन केल्याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला असून यातील काही कार्यकर्त्यांना अटक होऊ शकते.

गुन्हा दाखल झालेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे, माजी आमदार निर्मला गावित यांच्यासह इतर पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचा समावेश असून नाशिक मुंबई महामार्गाच्या मुद्द्यावर ठाकरे गटाकडून मंगळवारी घोटी टोल नाक्यावर आंदोलन केले होतं.

पदाधिकाऱ्यांनी महामार्ग खड्डेमुक्त होत नाही, तोपर्यंत टोल घेऊ नका अशी मागणी करत तब्बल एक तास घोटी टोल नाका बंद पाडला होता. या आंदोलनामुळे नाशिक-मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता.

यावेळी पोलिसांनी ठाकरे गटाच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. मंगळवारी रात्री उशिरा घोटी पोलिसांनी ठाकरे गटाच्या २४ प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. जमाव बंदीचे आदेश असताना जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Leave a Comment