Maharashtra Politics । उद्धव ठाकरेंनी आखला मोठा डाव, विधानसभेपूर्वी फुटणार भाजपचे 16 नगरसेवक?

Maharashtra Politics । लोकसभेनंतर आता अवघ्या काही महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. लोकसभेत महाराष्ट्रात महायुतीला महाविकास आघाडीकडून पराभव सहन करावा लागला होता. पराभवामुळे आता महायुती आगामी निवडणुकीच्या तोंडावर चांगलीच तयारीला लागली आहे.

महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी उमेदवारांची चाचपणी, बैठका तसेच मेळावे देखील सुरु केले आहेत. लोकसभेनंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा नवीन उत्साहात मैदानात उतरले आहेत.

छत्रपती संभाजीनगर मधून मोठी राजकीय बातमी समोर आली असून विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे तब्बल 16 नगरसेवक हे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विधानसभेपूर्वी भाजपसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत येत्या 7 जुलै रोजी सर्व नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. उपलब्ध माहितीनुसार, भाजपचे राजू शिंदे छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. पण हा मतदारसंघ सध्या शिंदे गटाच्या ताब्यात आहे.

या मतदारसंघातील संजय शिरसाठ हे सध्या विद्यमान आमदार असून ही जागा भाजपला मिळणे जवळपास अशक्य आहे. यामुळे राजू शिंदे यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निश्चिय केला आहे. आता लवकरच ते उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश करतील. राजू शिंदे यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी ताकद असून त्यांच्यासोबत आता भाजपचे १६ आमदार ठाकरे गटात प्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave a Comment