Maharashtra Politics : शिंदेंचा डाव अन् ठाकरेंना धक्का! निवडणुकीच्या तोंडावर बडा नेता शिंदेसेनेत दाखल

Maharashtra Politics :  लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री बबनराव घोलप यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही मोठी घडामोडी घडल्याने महाविकास आघाडी आणि विशेषतः उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी बबनराव घोलप यांनी ठाकरे गटाच्या संपर्कप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. यानंतरही त्यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे बबनराव घोलप मोठा निर्णय घेतील आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशा चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या. अखेर या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला. माजी मंत्री बबनराव घोलप यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

Maharashtra Loksabha Election | बाब्बो.. शिवसेनेला मोठा धक्का..! म्हणून शिर्डीचे खासदार लोखंडे यांच्याबाबत इडीकडे तक्रार

बबनराव घोलप काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती घोलप हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून उमेदवारी इच्छुक होते मात्र ठाकरे करताना संधी नकारात भाऊसाहेब वाकचौरे यांना तिकीट दिले विशेष म्हणजे भाऊसाहेब वाकचौरे यांनी तिकीट मिळण्याच्या काही दिवस आधीच टाकरे गटात प्रवेश केला होता तरीसुद्धा ठाकरे गटाने त्यांना संधी दिली.

Maharashtra Politics

यामुळे बबनराव घोलप नाराज झाले होते यानंतर फेब्रुवारी महिन्यात त्यांनी उपनेते पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता यानंतर बबनराव घोलप शिंदे गटात प्रवेश करतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या आज अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आणि त्यांनी अधिकृत रित्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

पक्षप्रवेशानंतर बोलताना बबनराव घोलप म्हणाले की आज माझा शिवसेनेत प्रवेश होत आहे मी मागील 54 वर्षांपासून शिवसेनेत काम करत आहे बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत आणि कडवट शिवसैनिक म्हणून मी आजपर्यंत शिवसेनेत काम केले पक्षाने माझ्यावर ची जबाबदारी दिली ती मी अतिशय योग्यरीत्या पार पाडली मात्र उद्धव ठाकरे घटाने माझ्यावर सातत्याने अन्याय केला.

Maharashtra Politics

मला ज्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या त्या देखील काढून घेण्यात आल्या त्यामुळे मी उपनेते पदाचा राजीनामा दिला राजीनामा दिल्यानंतर ठाकरे गटाकडून माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले मला कुठलीही विचारणा झाली नाही त्यामुळे उद्धव ठाकरे यांना आता माझी गरज राहिली नाही असा अंदाज मला आला.  त्यामुळे आज मी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे बबनराव घोलप म्हणाले.

Shirdi Loksabha Election | शिवसेना खासदार लोखंडे अडचणीत; मोदी-शिंदे-फडणवीस यांच्या भूमिकेकडे देशाचे लक्ष

Leave a Comment