Maharashtra politics: भाजपाकडून सुरु असलेले सुडाचे राजकारण जनतेसमोर उलगडण्यासाठी महाप्रबोधन यात्रा काढली गेली आहे. सोबत आलेल्यांना सेट करु, विरोधात गेला तर शूट करु ही भाजपची निती क्लेषकारक असून भारतीय लोकशाहीला घातक असल्याची टीका शिवसेनेच्या(shivsena ) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज केली.
परतीचे दोर अजूनही कापलेले नाहीत :सुषमा अंधारे म्हणाल्या, शिंदेंसाेबत गेलेल्यांना आम्ही कधीच शत्रू म्हटलेले नाही. कधी कधी कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ठरतो . तसेच कधी कधी माणसे बेईमान होतात. कधी तरी त्यांना त्यांच्या चुका कळतील. परतीचे दोर आमच्याकडून अजून कापले गेले नाहीत.
https://www.india.com/marathi/health/
संजय शिरसाठ परत येतील :सुषमा अंधारे (sushma andhare)म्हणाल्या, शिंदेंसोबत गेलेल्यांपैकी सर्वप्रथम परत येणारे आमदार संजय शिरसाठ हे असतील. तेथे ते प्रचंड अस्वस्थ आहेत. त्यांची मंत्रिमंडळात देखील वर्णी लागली नाही. औरंगाबादमध्ये अतुल सावे(Atul Save), अब्दुल सत्तार(Abdul Sattar), संदीपान भुमरे (Sandipan Bhumare)यांना मंत्रीपदे दिल्याने शिरसाठांच्या मंत्रीपदाची आशा मावळली. कार्यकारीणी तही त्यांना स्थान मिळाले नाही. याचा सर्वाधिक पश्चात त्यांना होतोय. तर शिरसाठ उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले.
सोमय्यांची इडीशी ओळख :अंधारे जळगावात पत्रकार परिषदेत बोलत(Jalgaon press Conference ) असताना म्हणाल्या कि , जळगाव जिल्ह्यात कोविड काळात वैद्यकीय सुविधा देण्याबाबतचे टेंडर्स मध्ये झालेल्या अपहाराची पोलिस तक्रार दाखल आहे. भाजपचे किरीट सोमय्या यांची इडीशी चांगली ओळख आहे. मी लहान बहीण म्हणून त्यांना विनंती करते. कोविड काळात झालेला अपहाराकडे त्यांनीविशेष लक्ष दिले पाहिजे. पाचोऱ्यातील सात ते आठ प्लॉट आरक्षीत होते. कोवीड काळात त्यावरील आरक्षण (reservation)काढून कायदेशीर प्रक्रिया केली जात नसेल तर या 207 कोटींचा व्यवहाराकडेही लक्ष द्यावे.मी त्यांचा त्यांचा सदसदविवेक जागृत करण्याचा प्रयत्न करीत आहे. या सर्व प्रश्नांमध्ये सोमय्या मदत करावी अशी आहे आशा बाळगते .
सोमय्यांची पटशिष्य होईल :अनिल परब यांच्या बंगल्याकडे सोमय्यांनी जावे. पंरतु, राणेंच्या आदिश बंगल्याकडे फक्त हातोडा घेऊन ते कधी जाणार आहेत. तेथे हातोडा घेऊन गेल्यास मी त्यांच्या नावाचा गंडा हातात बांधून त्यांची पटशिष्य व्हायला तयार आहे.
अमृता फडणवीसांवर केली टीका :अमृता फडणवीसांना टोला लगावताना सुषमा अंधारे म्हणाल्या, त्या नक्की मॉडेल, गायक, समाजसेवक की राजकारणी आहेत, हे अमृता वहिणींनी ठरवावे. त्यांचा स्क्रिझोफिनीश मूड नेहमी स्विंग करत राहतो.
- Food recipe :स्नॅक्समध्ये बनवा “या ” पद्धतीने “शेंगदाणा भजी” आणि चहासोबत चवीचा आस्वाद घ्या
- Food recipe :हिवाळ्यात चुटकीसरशी बनवा “ही” चविष्ट आणि हेल्दी रेसिपी ;प्रत्येकजण आवडीने खाईल
- Brain Foods: 30+ वयोगटातील लोकांनी “या” पदार्थांचे रोज सेवन करा ,वाढेल स्मरणशक्ती
देवेंद्र फडणवीस कळसूत्री बाहुली :सुषमा अंधारे म्हणाल्या, शिंदे गटात जाण्यासाठी बच्चू कडूंना फोन केल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. यावरून शिंदे गटाच्या घडामोडींमध्ये भाजप आणि कळसूत्री सूत्रधार फडणवीस होते,हे सिद्ध होते.
संभाजी भिडेंवर देखील टीकास्त्र :सुषमा अंधारे म्हणाल्या, भाजप व्देषमुलक राजकारण पसरवत आहे.तर संविधानाच्या चौकटीची मोडतोड केली जात आहे. संभाजी भिडे (sambhaji bhide)यांनी त्यांच्या वक्तव्याला कितीही हिंदुत्वाचा दर्प दिला तरी ते व्यक्तीस्वातंत्र्यांची पायमल्ली करणारे असून संवैधानिक हक्कभंग करणारे आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली व्देषमूलक वातावरण पसरवले जात आहे.