Maharashtra News: भंडारदरा आणि मुळा धरणातून डाव्या आणि उजव्या कालव्यातून आवर्तन सोडण्याच्या सूचना पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
सध्या पावसाने एकदम दडी मारल्याने खरीप पीकांना पाण्याची मोठी गरज आहे.पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नही काही गावात अद्यापही भेडासावत असल्याने अनेक गावातून तसेच शेतकरी वर्गाकडून आवर्तन सोडण्याची मागणी होत होती.
जिल्हाधिकरी कार्यालयात मंत्री विखे पाटील यानी भंडारादरा आणि मुळा धरणातील पाण्याच्या परिस्थितीचा आढावा घेवून दोन्ही धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यांतून शनिवारीच आवर्तन सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आवर्तन सोडण्याच्या निर्णयाने दोन्ही धरणाच्या लाभक्षेत्रातील खरीप पीकांना मोठा दिलासा मिळणार आहे.