Maharashtra Loksabha Election : लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल हाती येण्यास सुरूवात झाली असून राज्यातील काही जागांवरील निकाल देखील हाती आले आहेत. दरम्यान, राज्यात मागील दोन वर्षात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. या पक्षफुटीचा परिणाम या निवडणुकीवर झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही लोकसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष होते.
काही लोकसभा मतदारसंघाचे निकाल समोर आले आहेत. अनेक नेत्यांची बंडखोरी राज्यातील जनतेला रचलेली दिसत नाही. उमेदवारांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करायला सुरुवात केली आहे.
जाणून घ्या मतदार संघ विजयी उमेदवार पक्ष
अमरावती – बळवंतराव वानखेडे (काँग्रेस)
उस्मानाबाद – ओमराजे निंबाळकर (शिवसेना ठाकरे गट)
जळगाव – स्मिता वाघ (भाजप)
ठाणे – नरेश म्हस्के (शिवसेना शिंदे गट)
नंदूरबार – गोवाल पाडवी (काँग्रेस)
पालघर – हेमंत सावरा (भाजप)
पुणे – मुरलीधर मोहळ (भाजप)
बारामती – सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)
नागपूर – नितीन गडकरी (भाजप)
नाशिक – राजाभाऊ वाजे (शिवसेना ठाकरे गट)
रायगड – सुनिल तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
रावेर – रक्षा खडसे (भाजप)
शिरूर – अमोल कोल्हे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)
शिर्डी- भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना उद्धव ठाकरे गट)
सांगली – विशाल पाटील (अपक्ष)
मुंबई उत्तर पश्चिम – अमोल किर्तीकर (शिवसेना उद्धव ठाकरे गट)
मुंबई उत्तर मध्य – वर्षा गायकवाड (काँग्रेस)
मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई (शिवसेना ठाकरे गट)
कोल्हारपूर – शाहू महाराज छत्रपती (काँग्रेस)