Maharashtra Loksabha Election | पुणे: अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या महत्वाच्या लोकसभा निवडणुकीत यंदा शिवसेनेने यंदा सर्व विरोध डावलून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनाच संधी दिली होती. त्यांनी प्रचारही सुरू केला होता. मात्र, आता शिवसेनेला मोठा धक्का देणारी पत्रकार परिषद पुण्यात झाल्याने येथील उमेदवारी बदलणार की पुन्हा लोखंडे यांनाच कायम ठेऊन महाविकास आघाडी लढणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट व नेवासा तालुका शेतकरी उत्पादक कंपनीचे डॉ भारत करडक यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, बेकायदेशीर कर्ज वितरण करणाऱ्या सर्व संस्थांची कॅग, इडी सारख्या यंत्रणेमार्फत चौकशी करून नियम डावलून अनुदान मिळवणाऱ्या व्यक्ती व वितरण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. त्यासाठी त्यांनी खासदार पदाचा गैरवापर केला आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांच्या खेमानंद दूध आणि कृषी प्रोडूसर कंपनीमध्ये एकाच कुटुंबातील सर्व 10 संचालक आणि कुटुंबाकडे 95% पेक्षा जास्त शेअर्स असूनही अनुदानाचा लाभ मिळाला आहे. हे नियमबाह्य असल्याची तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी व सक्त वसुली संचालनाकडे करण्यात येणार आहे.
एकूणच शेतकऱ्यांच्या योजनेचे कोट्यवधी रुपये गडप करण्याचे हे गंभीर प्रकरण आहे. त्यामुळे आता शिवसेना नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे के निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकरी व शेतकरी कंपन्यांसाठी असलेला निधी आणखी कोणत्या प्रभावशाली व्यक्ती व त्यांच्या मित्रांनी मिळवला आहे याची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करून लाटलेले अनुदान वसुल करण्यात यावे अशी मागणी करताना याप्रकरणी आंदोलन उभारण्याची भाषा पत्रकार परिषदेत करण्यात आलेली आहे.
Signed Press Note खासदार लोखंडे कडून पदाचा गैरवापर