Maharashtra Lok Sabha | मविआ जोमात, महायुती कोमात! ‘त्या’ 9 मतदारसंघात एकमत होईना

Maharashtra Lok Sabha Elections : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर (Maharashtra Lok Sabha Elections) जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला. या फॉर्मुल्यानुसार शिवसेना 21 काँग्रेस 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 10 जागांवर निवडणूक लढणार आहे. महाविकास आघाडीत अशा पद्धतीने कामकाज सुरू असताना दुसरीकडे महायुद्धात मात्र धुसफूस चांगलीच वाढली आहे. महायुतीने आतापर्यंत 39 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. परंतु 9 मतदार संघात मात्र मोठा तिढा निर्माण झाला आहे. हा तिढा सोडविताना महायुतीच्या नेत्यांची चांगलीच दमछाक होत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी-सिंधुदुर्ग, दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई, पालघर आणि सातारा मतदारसंघात भाजप उमेदवार देईल. एकनाथ शिंदे यांचे शिवसेना ठाणे, छत्रपती संभाजीनगर, मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात उमेदवार घोषित करू शकते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सहा जागा देण्यात आल्या आहेत. लक्षद्वीपमधील एक जागाही त्यांना मिळणार असण्याची शक्यता आहे. बारामती, शिरूर, रायगड, धाराशिव, परभणी आणि लक्षद्वीप या जागा अजित पवार गटाला दिल्याची माहिती आहे.

Shirdi Loksabha Election | पदाचा गैरवापर करणाऱ्या लोखंडेंची उमेदवारी धोक्यात; त्या’ प्रकरणी शेतकरी संघटना करणार आंदोलन

महायुतीत नाशिक आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन्ही मतदारसंघांवरून मोठा तिढा निर्माण झाला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना या मतदारसंघातून निवडणुकीत उतरवण्याची योजना भाजपने आखली आहे. परंतु या मतदारसंघावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही दावा केला आहे. या मतदारसंघातून उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत इच्छुक आहेत. त्यांनी निवडणूक लढण्याची पूर्ण तयारी सुद्धा केली आहे. परंतु भाजपने दावा ठोकल्यामुळे या मतदारसंघात आता मोठा तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना अजूनही उमेदवारी निश्चित करता आलेली नाही.

नाशिकमध्येही असाच तिढा निर्माण झाला आहे. या मतदारसंघात शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे पुन्हा इच्छुक आहेत तर अजित पवार गटाने छगन भुजबळ यांच्यासाठी या मतदारसंघावर दावा ठोकला आहे. त्यामुळे उमेदवारी कोणाला द्यायची याचा निर्णय महायुतीच्या नेत्यांना अजून घेता आलेला नाही.

Shirdi Loksabha Election | शिर्डीच्या खासदारांनी गट्टम केलेत 16 कोटी..! उमेदवारी रद्द करण्यासह वसूली करण्याची ED कडे मागणी

महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला 

दुसरीकडे महाविकास आघाडीने जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करून आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, माढा, रावेर आणि अहमदनगर दक्षिण या जागा लढणार आहे. तर ठाकरे गट जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, हातकणंगले, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई, दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई या जागा लढवणार आहे.

जागावाटपात काँग्रेस पक्षाला 17 जागा मिळाल्या आहेत यामध्ये नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, रावेर, जालना, मुंबई नॉर्थ सेंट्रल, पुणे, लातूर, सोलापूर, रामटेक आणि उत्तर मुंबई या मतदारसंघांचा समावेश आहे.

Leave a Comment