मुंबई : महाराष्ट्रासमोर पुन्हा एकदा गंभीर वीजसंकट उभं ठाकलं आहे.. खुद्द ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीच या संकटाबाबत संकेत दिले आहेत. उन्हाच्या झळा वाढत असल्याने विजेच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. त्याच वेळी औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात कोळशाची टंचाई निर्माण झाली आहे. कोराडी वीज प्रकल्पात केवळ 1 दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे राज्यावर अंधाराचे गडद संकट निर्माण झाले असून, येत्या काही काळात नागरिकांना लोडशेडिंगला सामोरे जावे लागू शकते. राज्यात काही ठिकाणी गुरुवारी (ता. 7) रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झालाय. त्यामुळे आधीच उकाड्याने हैराण झालेले नागरिक वीज नसल्याने आणखी त्रस्त झालेत.
कोल इंडियाकडून अपुरा कोळसा पुरवठा होत आहे. महानिर्मितीच्या कोयना जलविद्युत प्रकल्पातूनही पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करावी लागत असल्याने पाण्याचा साठाही वेगाने कमी होत आहे. 1 हजार मेगावॉटची वीजटंचाई भासण्याची शक्यता आहे. राज्याला तातडीने वीज खरेदी करावी लागणार आहे, अन्यथा राज्य काळोखात बुडण्याची भीती व्यक्त होत आहे..
दरम्यान, वीज टंचाईवर तोडगा काढण्यासाठी उर्जामंत्री राऊत यांनी आज तातडीची बैठक बोलावली आहे.. वीजखरेदी करण्याचा ऊर्जा विभागाचा प्रस्ताव तयार आहे. टाटा पॉवरच्या कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेड या 4 हजार मेगावॉटच्या वीज प्रकल्पातून उन्हाळ्यात वीज मिळू शकते, अशी माहिती उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली. त्यावर आजच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे बोलले जाते.
रोजगारासाठी मेगा प्लान..! शंभर दिवसात ‘इतक्या’ बेरोगारांना मिळणार रोजगार; पहा, कुणी घेतलाय निर्णय..
‘त्या’ प्रकरणात एकनाथ खडसे यांची होणार चौकशी; मुंबई पोलिसांनी दिला नोटीस