Maharashtra IMD Alert & Weather Forecast: सोलापूर : मागील आठवड्यात हजारो शेतकऱ्यांची झोप उडवणाऱ्या अवकळी पावसाचे संकट अजूनही सरलेले नाही. कारण चालू आठवड्यातही महाराष्ट्र राज्याच्या काही भागात अवकळी बरसण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्र (Regional Meteorological Centre, Mumbai) यांच्या अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्यात दिनांक २४ मार्च आणि २५ मार्च २०२३ रोजी काही ठिकाणी वादळी वारा आणि मेघगर्जना व विजांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विस्तारीत अंदाजानुसार सोलापूर,धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात दिनांक २२ मार्च ते २८ मार्च २०२३ दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा आधिक राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान सरासरीपेक्षा मध्यम कमी राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. (Dhule, Nandurbar, Jalgaon, Nashik, Ahmednagar, Pune, Satara, Sangli, Solapur and Kolhapur)
हवामान अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये दिनांक २२ मार्च ते २६ मार्च २०२३ दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहील. दिनांक २४ मार्च २०२३ ते २६ मार्च २०२३ दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे, तर दिनांक २२ मार्च ते २३ मार्च २०२३ दरम्यान हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मध्यम स्वरूपाच्या अवकळी पावसाची शक्यता असल्याने पक्व झालेली रब्बी पिकाची काढणी तातडीने करून घ्यावी. तसेच काढणी झालेल्या पिकांची मळणी करून उत्पादित मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढलेली पिके पावसापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने योग्यरित्या तडपत्रीने झाकून ठेवावीत. तसेच शक्य असल्यास हेल नेटचा वापर करावा. पक्व झालेली रब्बी पिकांची स्थिती लक्षात घेऊन ज्वारी, गहू , हरभरा, मका इत्यादींची काढणी करुन घ्यावी. उघड्यावरील धान्य सुरक्षित स्थळी हलवावे. पावसाचा अंदाज बघून मगच पिकावर किटकनाशकाची, बुरशीनाशकाची फवारणी करावी. जनावरे सुरक्षीत ठिकाणी बांधून त्यांची योग्य टी काळजी घ्यावी, असे मोहोळ येथील जिल्हा कृषि हवामान केंद्र (कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, सोलापूर) यांनी म्हटले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, ज्वारीची मळणी करणे शक्य नसल्यास, काढलेली पिके पावसापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने योग्यरीत्या झाकून ठेवावीत. यासह पावसाची शक्यता लक्षात घेता काढणी केलेला ज्वारीचा कडबा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. पक्व झालेल्या हरभरा पिकाची काढणी व मळणी करावी.काढलेली पिके पावसापासून संरक्षन होण्याच्या दृष्टीने योग्य काळजी घेऊन तडपत्रीने झाकून ठेवावीत. तर, गहू परिपक्व झाला असल्यास काढणी करून घ्यावी. गव्हाची मळणी यंत्राच्या सहाय्याने करावी किंवा गव्हाची कापणी व मळणी कंबाईन हारवेस्टर मशीनने करावी. काढणी झालेल्या पिकांची मळणी करुन सुरक्षीत ठिकाणी साठवणूक करावी. रब्बी मका पीक परिपक्व झाले असल्यास काढणी करून घ्यावी.काढणी झालेल्या पिकाची मळणी करावी. धान्य स्वच्छ करून घ्यावेत व उन्हात वाळवून कोरड्या जागी साठवणूक करावी.
प्रकाशक – रुद्र इंटरप्रायजेस
किंमत : 250
Amazon वर सुद्धा उपलब्ध पुस्तक ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.
https://www.amazon.in/dp/B0BXKNW7NT?ref=myi_title_dp
भाजीपाला सल्ला : काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांचे तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. तुरळक ठिकाणी झालेल्या वादळी वारा, पाऊस, यामुळे नुकसान झालेल्या भाजीपाला पिके टरबूज, खरबूज गोळा करून नष्ट करावीत. तुरळक ठिकाणी झालेला पाऊस व ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला पिकात रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कार्बेन्डाझिम ३० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावे. तर, सुरू उसाचे खोड किडीमुळे शेंडे वाळत असतील, तर क्लोरअॅन्ट्रानिलीप्रोल (०.४ जीआर) ७.५ किलो किंवा फिप्रोनील (०.३ जीआर) १० ते १२ किलो प्रति एकरी वापरावे. अन्यथा क्लोरपायरीफॉस (२० ईसी) २ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. मार्च महिन्यामध्ये सरासरी बाष्पीभवनाचा वेग ७.३३ प्रति दिवस एवढा असतो ऊस पिकास दररोज ६.०६लिटर पाण्याची आवश्यकता असते त्यासाठी ठिबक सिंचन संच (४ लिटरचा ड्रीपर) दररोज ०१ तास ३१ मिनिटे चालवावा.
फळपीक सल्ला : वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने केळी बागेतील वजनाने मोठ्या असलेल्या घडांची झाडे पडु शकतात. केळी बागेतील झाडे पडू नयेत म्हणून व वजनाने मोठ्या असलेल्या घडास गरजेप्रमाणे बांबूचे किंवा पॉलीप्रोपेलीनच्या पट्यांच्या सहयाने झाडांना / घडाना आधार/ टेकू द्यावा. तर, पक्व झालेल्या द्राक्ष घडांची त्वरित काढणी करावी व सुरक्षित ठिकाणी ठेवावे तुरळक ठिकाणी झालेल्या वादळी वारा, पाऊस, गरपीट यामूळे यामूळे द्राक्षबागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. सध्याची पावसाची स्थिती डाळिंब बागेत तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यास अनुकूल आहे. तेलकट डाग रोगाच्या व्यवस्थापनासाठी ब्रोनोपॉल (९५ – ९८%) ०.५ ग्रॅम प्रती लिटर पाणी + कॉपर ऑक्सीक्लोराईड २ ते २.५ ग्रॅम प्रती लिटर पाणी + स्प्रेडर स्टिकर ०.५ मिली प्रती लिटर पाणी याप्रमाणात पाऊस पडल्यानंतर फवारणी करा.
- Monsoon Updates: मान्सूनची होणार एंट्री? ‘या’ राज्यात 7 जूनपर्यंत मुसळधार पाऊस
- Gold Price Today: सोन्याच्या दरात घसरण! खरेदीसाठी उत्तम संधी, जाणुन घ्या नवीन दर
- RBI ची मोठी कारवाई! ‘या’ बँकेला ठोठावला कोटींचा दंड; ‘हे’ आहे कारण
- Asia Cup 2023 : ‘त्या’ प्रकरणात पाकिस्तानने दिली श्रीलंकेला धमकी, वाचा सविस्तर
- Airtel Recharge Plan: जबरदस्त! फक्त 155 रुपयांमध्ये एअरटेल देत आहे अनलिमिटेड कॉलिंगसह ‘ही’ भन्नाट सुविधा
जनावरांचे व्यवस्थापन व सल्ला : पावसाची शक्यता असल्याने जनावरे शक्यतो बाहेर चारावयास नेऊ नयेत. जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत. जनावरणा शुद्ध, स्वच्छ आणि थंड पाणी पिण्यास द्यावे.लाळ्या खुरकत रोगापासुन बचावासाठी निरोगी जनावरांना लाळ्या खुरकत रोगाची प्रतिबंधक लस मार्च महिन्यामध्ये अधिकृत पशुवैद्यकीय अधिकार्याच्या सल्ल्याने टोचून घ्यावी. ३ महिन्याच्या आतील तसेच गाभण जनावरांना लस देणे टाळावे. (संदर्भ : प्रमुख अन्वेषक, ग्रामीण कृषि मौसम सेवा-जिल्हा कृषि हवामान केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, सोलापूर AGROMET ADVISORY BULLETIN GRAMIN KRISHI MAUSAM SEWA, DISTRICT AGROMET UNIT, KRISHI VIGYAN KENDRA, MOHOL, SOLAPUR) To downaload Meghdoot App click on this link:https://play.google.com/store/apps/details?id=com.aas.meghdoot