Maharashtra Famous Tourist Place : पावसाळ्यात फिरायला जायचा प्लॅन करताय? ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या

Maharashtra Famous Tourist Place : अवघ्या दिवसातच पावसाळ्याचे दिवस सुरु होतील. या दिवसात अनेकजण विविध ठिकाणांना भेटी देतात. महाराष्ट्रात अशी काही पर्यटनस्थळे आहेत जी मनाला खूप भुरळ घालतात.

अलिबाग आणि तारकर्ली :

अलिबाग हे महाराष्ट्राच्या कोकण प्रदेशात वसलेले एक लहान किनारी शहर असून ज्याला आपण ‘मिनी-गोवा’ असेही म्हणतो. मुंबईपासून अलिबाग सुमारे ११० किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी तुम्ही वालुकामय किनारे आणि अनेक मंदिरे आणि किल्ले पाहू शकता.

तारकर्ली हे समुद्रकिनारी एक सुंदर पर्यटन स्थळ आहे, या ठिकाणी तुम्हाला ‘स्कूबा डायव्हिंग’चा आनंद लुटता येईल. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसलेले हे लांब किनाऱ्यासाठीही प्रसिद्ध असून या ठिकाणी तुम्ही नौकानयन करू शकता, डॉल्फिन पाहू शकता तसेच कयाकिंग, बनाना बोट सेलिंग, जेट स्कीइंग इत्यादी अनेक साहसी क्रियाकलाप करू शकता.

रत्नागिरी :

महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये समुद्र, जंगल, मंदिरे, स्मारके, किल्ला, हिल स्टेशन इत्यादी सर्व काही आहे. रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्राच्या कोकण विभागाचा एक भाग असून हे लक्षात घ्या की रत्नागिरीजवळ चिपळूण शहर आहे, जे सुंदर तलावासाठी प्रसिद्ध आहे. येथे पांढऱ्या वाळूच्या समुद्रकिनाऱ्यांचा आनंद लुटता येईल.

लोणार सरोवर :

महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात लोणार नावाच्या ठिकाणी एक सरोवर असून ज्याला लोणार सरोवर असे म्हणतात. हा तलाव सुमारे 5 लाख 70 हजार वर्षे जुना आहे. त्याची खोली सुमारे 150 मीटर आहे आणि त्याचा व्यास 1.2 किलोमीटर इतका आहे. विशेष म्हणजे हा सुंदर तलाव पाहण्यासाठी देशभरातून लोक येतात कारण तो खडक पडल्याने तयार झाला होता.

पाचगणी हिल स्टेशन :

पाचगणी हे महाराष्ट्रातील सुंदर आणि लोकप्रिय हिल स्टेशनपैकी एक असून याच्या एका बाजूला सतत वाहणारी कृष्णा नदी, दुसऱ्या बाजूला घनदाट सावलीच्या झाडांच्या रांगा, एका बाजूला विस्तीर्ण हिरवीगार मैदाने, तर याच्या दुसऱ्या बाजूला ढगांचे मनमोहक दृश्य.

हे लक्षात घ्या की पाचगणीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते घनदाट सावलीच्या झाडांनी भरलेले आहे जे जगभरात सर्वात प्रसिद्ध आहे आणि अनेक देशांची खास ओळख असून विशेषतः फ्रान्सची पाईन्स, बोस्टनची द्राक्षे, स्कॉटलंडची प्लम्स आणि रत्नागिरीतील प्रसिद्ध आंब्याच्या बागा प्रसिद्ध आहेत.

Leave a Comment