Maharashtra Congress । काँग्रेस करणार मोठा धमाका, घेतला शरद पवारांसह उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढवणारा निर्णय

Maharashtra Congress । नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हा पक्ष राज्यातअव्वल क्रमांकाचा पक्ष ठरला . विशेष म्हणजे काँग्रेसमध्ये मागील दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढणाची तयारी सुरू केली आहे, अशी चर्चा सुरु आहे.

यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदार संघातील इच्छुकांचे अर्ज मागविली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांनी 10 ऑगस्टपर्यंत प्रदेश कमिटीकडे अर्ज पाठवण्याची व बंडखोरी टाळण्यासाठी हमीपत्र देण्याची अट घातली आहे.

काँग्रेस जरी 288 जागा लढण्याची तयारी करत असली तरी शरदचंंद्र पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी राज्यात ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढणार आहे, असे सांगितले होते. यामुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्षांवर दबाव टाकत जास्त जागा मिळवण्यासाठी काँग्रस ही खेळी करत आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 13 जगांवर दमदार विजय मिळवत राज्यातील अव्वल पक्ष ठरला आहे. सांगली लोकसभा निवडणुकीतून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या विशाल पाटील यांनीही काँग्रेसला पाठिंबा दिल्याने त्यांचा आकडा 14 वर गेला आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. येत्या काही महिन्यातच राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. येणारा काळ हा राज्यासाठी महत्त्वाचा असणार आहे.

महाराष्ट्रात निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. असे असले तरीही महाविकास आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. आगामी निवडणुकीत आता कोणाचे सरकार येणार? हे पाहणे महत्त्वाचे असेल.

Leave a Comment