Maharashtra Cabinet । सर्वात मोठी बातमी! ‘या’ खेळाडूंना मिळणार थेट सरकारी नोकरी

Maharashtra Cabinet । केंद्र आणि राज्य सरकार सतत जनतेच्या हितासाठी कल्याणकारी निर्णय घेत असते. ज्याचा जनतेला खूप लाभ होतो. नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत खेळाडूंसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

जागतिक किर्तीच्या राज्यातील खेळाडूंसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जागतिक पातळीवर पदक प्राप्त केलेल्या खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती मिळेल. यामुळे जागतिक किर्तीच्या राज्यातील खेळाडूंची मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती होईल. ऑलिम्पिक स्पर्धा, पॅराऑलिम्पिक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळविलेल्या खेळाडूंना या निर्णयाचा मोठा फायदा होईल.

दरम्यान, राज्य सरकारने खेळाडूंबाबत घेतलेल्या निर्णयामुळे विविध खेळांमध्ये चांगली कामगिरी करु इच्छुणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन मिळेल. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने टीम इंडियाला वर्ल्ड जिंकल्याबद्दल 11 कोटींचं बक्षीस जाहीर केलं होतं. टीम इंडियातील मुंबईच्या चार खेळाडूंना प्रत्येकी एक कोटी रुपयांचं बक्षीस देखील राज्य सरकारकडून दिले होते.

जेत्या संघातील मुंबईच्या चार खेळाडूंचा विधान भवनात सत्कार करण्यात आला. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे विरोधकांकडून टीका केली जात होती. पण आता राज्य सरकारने इतर खेळांमध्येही उल्लेखणीय कामगिरी करणाऱ्यांना शासकीय सेवेत रुजू करण्याचा निर्णय घेतला असल्याने विरोधक आता कोणती भूमिका मांडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

दरम्यान, काल मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर ही सर्वपक्षीय बैठक सरकारने बोलावली होती. पण ही बैठक पार पडली नाही. तरीदेखील राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत खेळाडूंना सरकारी सेवेत घेण्याबाबतचा मोठा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment