Maharashtra Cabinet Meeting । राज्य मंत्रिमंडळाची आज होणार महत्त्वाची बैठक, शेतकरी, महिलांबाबत होणार मोठी घोषणा

Maharashtra Cabinet Meeting । आज महाराष्ट्र मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत सरकारी शिक्षक, शेतकरी आणि महिलांबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वृत्तानुसार, अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करण्यासाठी आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या मुलींना 100% फी प्रतिपूर्ती देण्यात येईल. गरजू महिलांना रोजगारासाठी गुलाबी रंगाच्या ई-रिक्षा देण्याचा निर्णय घेतले जाणार आहे.

इतकेच नाही तर शिक्षण सेवकांच्या पगारवाढीचाही विचार करण्यात येणार आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देणे, नवीन पर्यटन धोरण आणि इतर महत्त्वाच्या विषयांवरही मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय देखील घेतले जाणार आहेत. त्यामुळे आज होणारी बैठक खूप महत्त्वाची असणार आहे.

नुकतेच घेतलेले राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय

  • पुणे रिंगरोडच्या बांधकामासाठी हुडकोकडून 5,500 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले.
  • चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशनला भाडेतत्त्वावरील मुद्रांक शुल्कात सवलत दिली.
  • विधवांसाठी वारसा प्रमाणपत्राची फी 75 हजारांवरून 10 हजार रुपये केली.
  • मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 3,909 कि.मी. लांबीच्या रस्त्याच्या सुधारणांसाठी $310 दशलक्ष कर्ज मंजूर केले.
  • विरार ते अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉरच्या भूसंपादनासाठी हुडकोने 22,250 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले.
  • मुंबई मेट्रो-3 लवकरच सुरू होणार; यासाठी सरकारने थेट मुंबई मेट्रो रेल्वेला ११६३ कोटी रुपये देण्यास मान्यता देण्यात आली.
  • रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला दिलेल्या भूखंडाच्या भाडेपट्ट्यात सुधारणा करून महालक्ष्मी रेसकोर्समध्ये ‘सेंट्रल पब्लिक पार्क’ हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला जाईल.

Leave a Comment