Maharashtra Cabinet Decision : शिंदे सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक

Maharashtra Cabinet Decision : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची (Maharashtra Cabinet Decision) बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यातील एक महत्वाचा निर्णय म्हणजे शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव बंधकारक. राज्य सरकारच्या महिला बालकल्याण खात्याकडून (Maharashtra Government) हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार आता येथून पुढे सरकारी कागदपत्रांवर वडिलांसोबत आईचे नाव लिहीणे बंधनकारक होणार आहे.

Maharashtra Cabinet Decision

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण 19 निर्णय घेण्यात आले. त्यातील हा महत्वाचा निर्णय होता. या बैठकीत बंद पडलेल्या 58 गिरण्यांमधील घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र सुरू करणे, जीएसटी विभागात नवीन 522 पदांना मंजुरी, राज्य उत्पादन शुल्क विभागात नवीन संचालक पदासाठी मंजुरी असे आणखी काही निर्णय घेण्यात आले.

Maharashtra Politics । निवडणुकीपूर्वीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! बड्या नेत्यावर दाखल झाला गुन्हा

Maharashtra Cabinet Decision

जानेवारी महिन्यात अयोध्येत (Ayodhya) श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir) सोहळा पार पडला. यानंतर अयोध्येत अतिथीगृह उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. या अतिथीगृहाच्या बांधकामासाठी भूखंडाबाबत आजच्या बैठकीत निर्णय घेतला गेला. राज्यातील उपसा जलसिंचन योजनेच्या ग्राहकांना वीजदरात सवलत देण्याच्या योजनेला आणखी मुदतवाढ देण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. तसेच राज्यातील 61 अनुदानित आश्रमशाळांच्या दर्जात वाढ करण्यास मान्यता देण्यात आली.

देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात (Mumbai) तब्बल 300 एकर जागेत जागतिक दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क उभारण्यात येणार आहे. यासंबंधीही बैठकीत निर्णय घेण्यात आला. तसेच सरकारी कागदपत्रांवर वडिलांच्या नावासोबत आईचे नाव लिहिण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, या निर्णयाची अंमलबजावणी सत्ताधाऱ्यांनी स्वतःपासून केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयासमोर त्यांच्या नेमप्लेटमध्ये या निर्णयानुसार बदल केल्याचे दिसून आले. Maharashtra Cabinet Decision

Grapes Harvest Festival । द्राक्ष उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! पर्यटन संचालनालयामार्फत नाशिक ग्रेप हार्वेस्ट महोत्सवाचे आयोजन

Leave a Comment