मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत राज्याचा 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात सुरुवातीलाच अर्थमंत्री पवार यांनी राज्यातील उद्योगाबाबत मोठी घोषणा केली आहे. राज्यातील उद्योगांसाठी विशेष सवलत देणार आणि इनोव्हेशन हब उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. होतकरू विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी मुंबई, नाशिक आणि नागपूरमध्ये नॅनो, ड्रोन तंत्रज्ञानासाठी प्रत्येक महसूल विभागात एक इनोव्हेशन हब उभारण्यात येणार आहे. तसेच संदेशवहन उपग्रह, ड्रोन टेक्नोलॉजी जागतिक तंत्रज्ञानाच्या जमान्यात इनोव्हेशन हब सुरू करण्यात येणार आहे.
शालेय शिक्षण विभागासाठी 2 हजार 354 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागासाठी 11 हजार 199 कोटी रुपये तरतूद केली आहे. नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांऐवजी आता 75 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. कृषी संशोधनासाठी आधिकचा निधी शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे, असे पवार यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्र सरकारने मागील नोव्हेंबर महिन्यात इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात करुन लोकांना दिलासा दिला. त्यानंतर काही राज्यांनी व्हॅट कमी केला. या निर्णयांमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती काही प्रमाणात कमी झाल्या.
राज्य सरकारने मात्र याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे अन्य राज्यांच्या तुलनेत येथे इंधनासाठी जास्त पैसे द्यावे लागत आहेत. मात्र, यामुळे कोरोना काळाच्या तुलनेत राज्याच्या एकूण उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे आता राज्य सरकार जनतेला काही दिलासा देईल, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे. यााबाबत अंतिम निर्णय मात्र राज्य सरकार घेणार आहे.
Maharashtra Budget 2022 : आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार.. जाणून घ्या, महत्वाचे अपडेट..