Maharashtra Board Paper Leak: मोठी बातमी, 12वीचा जीवशास्त्राचा पेपर फुटला? सोशल मीडियावर व्हायरल

Maharashtra Board Paper Leak: सध्या राज्यात एचएससी बोर्ड परीक्षा सूरु आहे. मात्र आता या परीक्षा दरम्यान पेपर लीग झाल्याची घटना समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, 12वीच्या जीवशास्त्राच्या पेपरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे जाणुन घ्या, पेपरफुटीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र यामुळे विद्यार्थ्यांसोबत पालकही चिंतेत आहेत.

राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ ? ‘त्या’ प्रकरणात पोलिस बजावणार समन्स; जाणून घ्या सर्वकाही…

HSC 12वी बोर्डाची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे.  परभणीत बारावीचा जीवशास्त्र विषयाचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. 12वी बोर्ड परीक्षेची जीवशास्त्राची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र, सोशल मीडियावर कथित पेपर कोणी आणि कसा अपलोड केला, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र या घटनेने खळबळ उडाली आहे.

पेपरफुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी बोर्डकडून मोठी काळजी घेतली जात आहे. परीक्षा केंद्रांवर कॉपीकॅट रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पण जीवशास्त्राचा पेपर कथितरित्या लीक कसा झाला? हे तपासानंतरच समोर येईल.

‘या’ दिवशी होणार लोकसभा निवडणुकीची घोषणा; जाणुन घ्या संभाव्य तारीख

तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी राज्यातील वनविभाग आणि अन्य काही स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये अनियमितता असल्याच्या तक्रारी आल्या होत्या.

Leave a Comment