Maharashtra Assembly Election 2024: महायुतीचं ठरलं? भाजप 155 तर शिंदे- अजित पवारांना मिळणार ‘इतक्या’ जागा

Maharashtra Assembly Election 2024: लोकसभा निवडणुकीत महायुतीला फक्त 19 जागांवर विजय मिळाल्याने राज्यात महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आत्तापासूनच आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीने तयारी सुरू केली आहे.

तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती मधील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने 80 ते 90 जागांची मागणी केली आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील 100 जागांची मागणी केली आहे. त्यामुळे कोणाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागू आहे. 

यातच आता रामदास आठवले (Ramdas Aathavle ) यांनी देखील महायुतीकडे 10 जागांची मागणी केली आहे. तर मनसेकडून (MNS) 20 जागांची मागणी करण्यात येत आहे. 

तर दुसरीकडे भाजप देखील 155 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच भाजप शिवसेनेसाठी 60 ते 65 आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी 50 ते 55 जागा सोडणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.  याच बरोबर तीन मित्रपक्षांसाठी 15 जागा राखून ठेवण्याची भाजप तयारी करत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार (Ajit Pawar) काय भूमिका घेणार हे पाहावे लागणार आहे. 

लोकसभा निवडणुकीत 48 पैकी फक्त 17 जागांवर महायुतीला विजय मिळाला होता तर महाविकास आघाडीने 31 जागांवर विजय मिळवला होता आणि एक जागा अपक्ष उमेदवाराला मिळाली होती. 

तर महाविकास आघाडीमध्ये देखील आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे. माहितीनुसार तिन्ही पक्ष 96 – 96 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचा समजते.

Leave a Comment