Maharashtra Agriculture News: परभणी (Parbhani) : (बातमीदार – आनंद ढोणे पाटील) जिल्ह्यासह पूर्णा तालूक्यातील शेत शिवारात जुलै- ऑगस्ट २०२२ या महिन्यात सातत्याने दिड महिना जोरदार अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे पन्नास टक्यांपेक्षाही अधिक यंदाच्या खरीप हंगामातील सर्व पिके बाधीत होवून नेस्तनाबूत झाली. आता गेल्या बावीस दिवसापासून पाऊसाने एकदमच कमालीची उघडीप दिली आहे. त्यामुळे काही प्रमाणात अतिवृष्टीत कसे बसे तग धरुन उभे असलेली सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी ही पिके सुकून वाळून जात आहेत. शेतकऱ्यांच्या या स्थितीकडे दुर्लक्ष करणाऱ्या महसूल विभागाच्या तहसीलदारांना त्यामुळेच प्रहार संघटनेतर्फे वाळलेले सोयाबीन अर्पण करण्यात येत आहे. (Prahar organization is offering dried soybeans to the tehsildars of the revenue department who are ignoring the condition of the farmers)
गत महिनाभरापासून दररोजच दिवसा कडक उन्हं आणि रात्री आकाशात पडणारे टिपूर चांदणे शेतक-याची चिंता वाढवीत आहे. सध्या जिल्ह्यातील काही मंडळे सोडलीतर अधिकाधिक मंडळात विशेष करुन पूर्णा तालूक्यातील सर्व महसूल मंडळात कोरडा दुष्काळ पसरला आहे.सोयाबीन पिके सुकून वाळून जात आहेत. तरीही कृषी व महसूल खात्यातील अधिकारी कुंभकर्ण झोपेतच असून मोजक्याच क्षेत्राची पाहणी करुन वरिष्ठ महसूल अधिका-याकडे बाधीत माहिती पाठवण्यात आली आहे. नेमून दिलेल्या समितीतील तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवकांच्या टिमने प्रत्येक शिवार फिरुन न पाहता मनमानी पध्दतीने बाधित पिकाची पाहणी पंचनामा अहवाल तयार केला गेला जावून तो गुप्त रीत्या पाठवून सरकारची पाठराखण करीत शेतक-यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. याबद्दल प्रहारने तीव्र संताप व्यक्त केला आहे. (officer in the Agriculture and Revenue Department, is asleep and after inspecting only a few areas, the information about the problem has been sent to the senior revenue officer)
अतिवृष्टी आनूदानापासून उर्वरित सर्व शेतकरी वंचित राहणार आहेत. याचे गांभीर्य घेऊन शेतक-यांची आणि गोरगरीब जनतेची बुलंद तोफ असलेल्या माजी मंत्री आमदार बच्चू भाऊ कडू प्रणित प्रहार जनशक्ती पक्षाच्या पूर्णा शाखेच्या कार्यकर्त्यांच्या व शेतक-यांच्या वतीने तारीख ६ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्णा तहसीलदार यांना वाळलेले सोयाबीन अर्पन करण्यासाठी पूर्णा तहसील कचेरीवर भव्य शेतकरी मोर्चा निघणार आहे. त्याकरिता तालूक्यातील सर्व शेतक-यांनी आपल्या शेतातील सुकले वाळलेले सोयाबीन, कापूस आदी पिकाची दाठे घेऊन पूर्णा तहसील येथे उपस्थित राहण्याचे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नरेश जोगदंड, तालूका प्रमुख शिवहार सोनटक्के, उप तालूका प्रमुख बाभनराव ढोणे यासह सर्व प्रहार टिमच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.
पूर्णा तालूक्यासह परभणी जिल्ह्यातील सर्व शेतक-यांना आधी अतिवृष्टी अन् आता कोरडा दुष्काळ या दुहेरी संकटाने चितांक्रांत बनवले आहे. महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी जाहीर केली. परंतु,सबंधित खात्यातील अधिका-यांनी बाधीत क्षेत्राची पाहणी न करता घरी बसून थातूरमातूर पंचनामे करुन नदी नाल्या काठच्या अतिशय अल्प शेतक-यांची बाधीत क्षेत्र माहिती संकलित केली. यामुळे सरसकट आनूदान मिळणार नाही, असे असतानाही अगोदर ओला आणि आता कोरडा दुष्काळ पडला आहे. पिके वाळून जात आहेत. तरी देखील पंचनामे सुरु केले नाहीत. पूर्णेचे तहसीलदार यांना शेतक-याप्रती काहीच देणेघेणे दिसून येत नाही.प्रहार जनशक्ती पक्ष शेतकऱ्यांना आनूदान आणि पिक विमा दिल्याशिवाय गप्प बसणार नाही.वेळप्रसंगी वेगवेगळी आंदोलने करुन सरकारला व अधिका-यांना वठणीवर आणील, अशी माहिती शिवहार सोनटक्के (प्रहार जनशक्ती पक्ष पूर्णा तालुका प्रमुख) यांनी दिली आहे.
तर, अनेक दिवसांपासून शेतक-यावर ओढवलेल्या आस्मानी सुलतानी संकटाच्या समस्येवर वाचा फोडण्यासाठी झगडत आहे. तरीही गेंड्यांची कातडी पांघूरलेले अधिकारी बाधित क्षेत्राची पाहणी न करता गोल गोल कमी शेतक-याचे क्षेत्र बाधित झाल्याचे दाखवत आहेत.ओल्या आणि कोरड्या दुष्काळाने खरीप पिके पूर्ण वाया जात आहेत. तरी देखील सरकार व अधिकारी यांच्यात काय चाल चालू आहे? हेच समजत नाही.अतिवृष्टी केवळ नावाला जाहीर करुन शेतक-याच्या तोंडाला पाने पुसली जावून कोपराला गुळ लावून चाटत बसायची वेळ आस्मानी सुलतानी संकटाने आणली आसतानाही अद्याप कोणतीच हालचाल दिसून येत नाही.कोण्या शेतक-याचे किती क्षेत्र बाधित झाल्याचे लिहून दिले? याची माहिती गोपनिय ठेवून शेतक-यांना संभ्रमात ठेवले जात आहे.सबंधीत मस्तवाल अधिकारी मिटींगावर मिटींगात व्यस्त राहत आहेत. ईकडे शेतकरी मात्र ओल्या व कोरड्या दुष्काळात पिचला जावून आत्महत्येच्या व्युहचक्रात जाण्याच्या मार्गावर आहे. शेतकरी केवळ आशेवर जगत आहे.याचे स्थानिक पुढारी व लोकप्रतिनीधींना काहीच देणेघेणे राहीले नाही. शेतक-यांना सरसकट आनूदान मिळालेच पाहिजे. अन्यथा आम्ही लोकप्रतिनिधी आणि सबंधीत सरकारी बाबूंना स्वस्थ बसू देणार नाहीत, असे नरेश जोगदंड (उपजिल्हा प्रमुख, प्रहार जनशक्ती पक्ष परभणी) यांनी म्हटले आहे.