Maharashtra Agriculture News: परभणी (Parbhani) : (बातमीदार – आनंद ढोणे पाटील) Agriculture success story: खानापूर येथील प्रयोगशिल युवा शेतकरी पंडित थोरात (farmer story Pandit Thorat of Khanapur) यांनी यंदाच्या पाऊसाळी हंगामात भोपळा (pumkin farming) पिकापासून भरघोस उत्पादन घेतले आहे. आपण त्यांची शेतीमधील गोष्ट पाहूया.
परभणी तालूक्यातील व शहरालगत असलेल्या खानापूर येथील प्रगतिशील प्रयोगशिल शेतकरी (shetkari) पंडित थोरात यांनी या वर्षी जून महिन्यात पाच बाय दिड फूट अंतरावर क्रांती कंपनीचे (Kranti Seed) भोपळा बियाणे दिड एकर जमिनीवर लागवड केले होते. परंतु, यंदा जुलै महिन्यात सतत अतिवृष्टी (heavy rains) होत होती. अतिपाऊसाने भोपळा पिक येते की नाही, असा प्रश्न होता. मात्र, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील (vasantrao Naik Marathwada agriculture University / krishi Vidyapeeth) किटक शास्त्रज्ञ डॉ. पटाईत आणि तालूका कृषी अधिकारी बनसावडे यांचे या भोपळा पिकाच्या संगोपनासबंधी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. परिणामी पिक यशस्वी होऊन भरघोस उत्पादन निघत आहे. थोरात यांनी भोपळा वेलीला लगडलेले जवळपास १००० फळे महालक्ष्मी पूजन सणाच्या मुहूर्तावर काढणी केले असून त्याची ठोक बाजारामध्ये (APMC near farmers) ५० रुपये प्रति किलोने विक्री करीत आहेत. अजून एक ते दोन हजार फळे प्लाॅटमध्ये शिल्लक आहेत. एकूण फळे विक्रीतून त्यांना १ लाख रुपये निव्वळ उत्पन्न हाती येईल, अशी अपेक्षा आहे.
पंडित थोरात हे बारमाही विविध वाणांची भाजीपाला पिके घेत असतात. विशेष म्हणजे उत्पादीत झालेला भाजीपाला (vegetables farming) भल्या पहाटेच कृषी विद्यापीठ गेट समोर बसून विक्री करतात. स्वतः बसून भाजीपाला व फळ भाज्या विकल्याने अधिकचे पैसे मिळतात. असे पंडित थोरात यांनी सांगितले. तसेच ते ईतर शेतक-यांना (guidance to farmers) देखील नेहमी मार्गदर्शन करतात. त्यांच्या शेतीत विविध पिके घेण्यासाठी त्यांंना कृषी विद्यापीठ येथील किटक शास्त्रज्ञ डॉ. पटाईत व तालुका कृषी अधिकारी बनसावडे, कृषी साह्यक लोंढे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे असे थोरात सांगतात.
आज माझ्या शेतामधील मक्का उद्या हरतालिका व गणपती उत्सवानिमित्त (Ganesh Festival 2022) काढण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे मकाला एक पण फवारणी केलेली नाही. फक्त बीज प्रक्रिया करूनच लागवड करण्याचा सल्ला मला कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र येथून देण्यात आला. केळीची लागवड करताना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील यंत्राद्वारे याची पेरणी केली होती. टोकन पद्धतीमध्ये पेरणी झाल्यामुळे उत्पादनामध्ये वाढ झाली. हवा खेळती राहिली व वैरण पण झाली. या कामामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील पशु शक्तीचा योग्य वापर सोळंकी ताई व त्यांचा मी आभारी आहे, असे थोरात यांनी म्हटले आहे.