Mahadev Jankar : ठरलं तर! ‘या’ मतदारसंघातून जानकर ठोकणार शड्डू; तटकरेंनी केलं शिक्कामोर्तब

Mahadev Jankar will Contest in Parbhani Lok Sabha Constituency : राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांचंही (Mahadev Jankar) अखेर ठरलं आहे. शरद पवारांशी चर्चा करता करता त्यांनी थेट महायुती गाठली अन् उमेदवारी सुद्धा पक्की केली. आज त्यांच्या उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब झालं. महादेव जानकर यांच्या (Lok Sabha Election) राष्ट्रीय समाज पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून परभणीची जागा सोडण्यात आली आहे. या मतदारसंघातून जानकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. येत्या 1 एप्रिल रोजी जानकर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जानकरांच्या उमेदवारीची घोषणा केली. महायुतीतून निवडणूक लढण्याआधी महादेव जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. शरद पवार यांनीही त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक संकेत देत त्यांच्यासाठी माढ्याची जागा सोडण्याची तयारी केली होती. परंतु, ही राजकीय समीकरणे जुळून यायच्या आधीच महायुतीतील नेत्यांनी त्यांची मनधरणी केली आणि त्यांना पुन्हा महायुतीत घेतले. इतकेच नाही तर त्यांच्यासाठी लोकसभेची एक जागाही दिली. आज त्याच जागेवर तटकरे यांनी जानकरांच्या उमेदवारीची घोषणा केली.

Lok Sabha Election : अखेर, महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, जाणून घ्या कोणाच्या खात्यात कोणती जागा ?

Mahadev Jankar

महादेव जानकर म्हणाले, आम्ही महाविकास आघाडीकडे तीन जागा मागितल्या होत्या. परभणी, माढा आणि सांगली या तीन जागा होत्या. परंतु, शरद पवार यांनी फक्त माढ्याची जागा देण्याचे सांगितले होते. तर यावर शिवसेना आणि काँग्रेस या पक्षांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. यानंतर आम्ही महायुतीकडे दोन जागा मागितल्या होत्या त्यातील एक जागा देण्याचे त्यांनी मान्य केले.

त्यानंतर आता मी येत्या 1 एप्रिल रोजी परभणी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहतील, असे जानकर यांनी स्पष्ट केले. या मतदारसंघात महाविकास आघाडीने खासदार संजय जाधव यांंना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता महादेव जानकर विरुद्ध संजय जाधव अशी लढत निश्चित झाली आहे.

Mahadev Jankar

Lok Sabha 2024 : उद्धव ठाकरेंचे शिलेदार ठरले; 17 उमेदवारांची यादी जाहीर, शिर्डीचं तिकीट कुणाला?

Leave a Comment