Madhya Pradesh Politics : गुजरात, केरळनंतर मध्य प्रदेश! ‘या’ काँग्रेसच्या नेत्यांच्या हाती भाजपाचा झेंडा

Madhya Pradesh Politics : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला एकापाठोपाठ (Madhya Pradesh Politics) धक्के बसत आहेत. गुजरात आणि केरळनंतर मध्य प्रदेशातही मोठा धक्का बसला आहे. माजी खासदार, माजी केंद्रीय (Lok Sabha Election) मंत्री आणि माजी आमदार यांच्यासह 13 पेक्षा जास्त काँग्रेस नेत्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. भोपाळचे माजी खासदार सु्रेश पचौरी यांच्यासह इंदूरचे संजय शुक्ला आणि विशाल पटेल यांसारख्या अनेक नेत्यांनी भाजपात (BJP) प्रवेश केला.

या नेत्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला (Congress Party) सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान होणार आहे. याआधी अरुणाचल प्रदेश, गुजरात आणि केरळ मध्येही काँग्रेस नेत्यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर आता मध्य प्रदेशात काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. या नेत्यांमध्ये संजय शु्क्ला, विशाल पटेल यांचा समावेश आहे. हे दोन्ही नेते मोठा जनाधार असलेले नेते आहेत. मागील निवडणुकीत भाजप उमेदवारांचा पराभव करून ते विजयी झाले होते. कमलनाथ सरकारमध्येही या नेत्यांचे चांगले वजन होते. काँग्रेसच्या आमदारकीच्या काळात संजय शुक्ला यांनी अनेक लोकाभिमुख कामे केली. संजय शुक्ला हे भाजपाचे ज्येष्ठ नेते विष्णू प्रसाद शुक्ला यांचे पुत्र आहेत.

Congress Candidate First List : काँग्रेसची पहिली यादी जाहीर; राहुल गांधी ‘या’ मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात

Madhya Pradesh Politics

भाजपात प्रवेश केल्यानंतर संजय शुक्ला म्हणाले की भाजप हेच माझे कुटुंब होते. मी माझ्या कुटुंबात पुन्हा परतलो आहे. काँग्रेसने प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir) सोहळ्याचे आमंत्रण नाकारले तेव्हा मला खूप वाईट वाटले. आता भाजपात (BJP) आलोय तेव्हा जनहिताच्या कामांना जास्त प्राधान्य देणार आहोत.

माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी, माजी खासदार गजेंद्रसिंह कालुखेडी, माजी आमदार संजय शुक्ला, माजी आमदार विशाल पटेल, अर्जुन पालिया, अतुल शर्मा, कैसाश मिश्रा, डॉ. आलोक चांसोरिया, योगेश शर्मा, अतुल शर्मा, सुभाष यादव, दिनेश धिमोळे आदी नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. या नेत्यांच्या प्रवेशाने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीच्या आधी काँग्रेससाठी या नेत्यांचा भाजप प्रवेश काँग्रेससाठी नक्कीच डोकेदुखी ठरणारा आहे. दुसरीकडे भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झाली आहे.

Madhya Pradesh Politics

Rahul Gandhi: राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ ? ‘त्या’ प्रकरणात पोलिस बजावणार समन्स; जाणून घ्या सर्वकाही 

Leave a Comment