Madhya Pradesh News : मोठी बातमी! मंत्रालयाच्या इमारतीला भीषण आग; फायली, कागदपत्रे जळून खाक

Madhya Pradesh News : मध्य प्रदेशाची राजधानी भोपाळमधून (Madhya Pradesh News) मोठी बातमी समोर आली आहे. येथील मंत्रालयाच्या इमारतीला आज सकाळी भीषण आग लागली. वल्लभभवनच्या पाचव्या मजल्यावर ही आग लागली. तासाभराच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. यानंतर मुख्यमंत्री मोहन यादव (CM Mohan Yadav) यांनी या घटनेची माहिती घेतली. तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. आता या घटनेवरून राजकारण सुरू (MP Politics) झाले आहे.

इमारतीला लागलेल्या आगीत अनेक महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. जुन्या फायली आणि येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनाही आग लागल्याचे समजते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तासाभरानंतर आग आटोक्यात आली. इमारतीत अडकलेल्या पाच लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

Congress First List : दिग्गज अन् ज्येष्ठ नेते निवडणुकीच्या रिंगणात; काँग्रेसच्या प्लॅनिंग नेमकं काय?

Madhya Pradesh News

फायर सेफ्टी एक्सपर्ट पंकज खरे येथे उपस्थित होते. लष्कराचीही एक तुकडी येथे होती. मध्य प्रदेश सरकारचे सचिवालय वल्लभ भवनमध्ये आहे. दुसरीकडे आता या घटनेमुळे राजकारण तापले आहे. काँग्रेस नेते जितू पटवारी आणि विरोधी पक्षनेते उमंग यांनी तातडीने मंत्रालयात धाव घेतली. जितू पटवारी यांनी या घटनेसाठी राज्य सरकारला जबाबदार धरले आहे. ही आग सरकारनेच लावली असून भ्रष्टाचाराचे पाप लपवण्यासाठीच ही आग लावली आहे. शंभर टक्के ही आग सरकारी आग आहे असा आरोप जितू पटवारी यांनी केला.

Madhya Pradesh News

आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या इमारतीत सध्या चार राज्यमंत्र्यांची कार्यालये आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातील काही अधिकाऱ्यांची कार्यालयेही येथूनच चालतात. याआधी मुख्यमंत्री कार्यालयही येथेच असायचे. आता मात्र या इमारतीशेजारी असलेल्या दुसऱ्या इमारतीत मुख्यमंत्री कार्यालय आहे. या आगीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काळ्या धुराचे लोट इमारतीतून बाहेर पडताना दिसत आहे. या इमारतीत काही लोक अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले. ही आग कशामुळे लागली याचे कारण कुणालाच माहिती नाही. मात्र आग लागल्यावर येथे धूर पसरला होता.

Madhya Pradesh Politics : गुजरात, केरळनंतर मध्य प्रदेश! ‘या’ काँग्रेसच्या नेत्यांच्या हाती भाजपाचा झेंडा

Leave a Comment