Madha Lok Sabha | माढ्याचा तिढा वाढला! दोन्ही राजकारणी ‘बंधू’ महायुतीच्या विरोधात; पहा, काय घडतंय?

Madha Lok Sabha : माढा लोकसभा मतदारसंघ महायुतीत (Madha Lok Sabha) सर्वाधिक वादग्रस्त ठरू लागला आहे. महायुतीने या मतदारसंघात विद्यमान खासदार रणजतसिंह निंबाळकर यांनाच पुन्हा उमेदवारी दिली. त्यानंतर येथे नाराजी उफाळून आली. मोहिते पाटील कुटुंब कमालीचे नाराज झाले. आता तर धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत तुतारी हाती घेण्याचे निश्चित केले आहे. लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. तसेच त्यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे. हा भाजप अंतर्गत वाद एका बाजूला असताना दुसरीकडे अजित पवार गटातील रामराजे नाईक निंबाळकर देखील नाराज झाले आहेत. या नाराजीचा फटका बसण्याची शक्यता असल्याने भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

जर रामराजे निंबाळकर यांनी माढ्यात महायुतीच्या उमेदवाराला मदत केली नाही तर आम्ही सुद्धा बारामतीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत करणार नाही असा इशारा भाजप आमदार राहुल कुल यांनी कालच दिला होता. यानंतर तणाव कमी होईल असे वाटत होते. परंतु अजून तरी असे काही घडलेले नाही. रामराजे यांचे बंधू रघुनाथराजेंनी तर अशी भूमिका घेतल्याने महायुतीच्या नेत्यांचं टेन्शन वाढलं आहे.

Unmesh Patil : जळगावात भाजपला धक्का! तिकीट कट होताच ‘हा’ खासदार करणार ठाकरे गटात प्रवेश

Madha Lok Sabha

रामराजे निंबाळकर हे फलटणचे आहेत. तसेच महायुतीचे उमेदवार रणजित निंबाळकर सुद्धा फलटणचेच रहिवासी आहेत. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणात दोन्ही नेते एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. रणजितसिंह यांना उमेदवारी मिळण्याआधीपासूनच रामराजे यांनी त्यांना विरोध केला होता. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील यांना बरोबर घेत काही राजकीय डाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. अशातच आता त्यांचे बंधू रघुनाथराजे देखील विरोधात उतरले आहेत. त्यामुळे मतदारसंघातील गणिते वेगाने बदलू लागली आहेत.

दरम्यान, आता महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळेल हे निश्चित आहे. त्यामुळे मोहिते पाटील लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. शनिवारी अकलूज येथे मोहिते पाटील यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास रघुनाथराजे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी आम्ही युतीधर्म पाळणार नाही असे स्पष्ट शब्दात सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीच्या अडचणी वाढल्या आहेत. आता मतदारसंघातील ही संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून काय प्रयत्न केले जातात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Madha Lok Sabha : माढ्यात महायुतीचा उमेदवार ठरला पण, ‘मविआ’त तिढा?, शरद पवारांच्या मनात काय..

Madha Lok Sabha

Leave a Comment