Lumpy Skin Disease : अहमदनगर : जिल्ह्यात लम्पी स्किन (Lumpy Skin Disease) हा घातक आजार नियंत्रणात येत आहे असे वाटत असतानाच आजार पुन्हा वेगाने वाढू लागला आहे. मागील आठ ते दहा दिवसात बाधित जनावरांत मोठी वाढ झाली असून जनावरांच्या मृत्यूचा आकडाही वाढत चालला आहे. शुक्रवारी (28 ऑक्टोबर) एकाच दिवसात तब्बल 538 बाधित जनावरे आढळली. नगर जिल्ह्यात आतापयर्यंत 15 हजार 597 जनावरांना या आजाराने (Lumpy Skin Disease Increase In Ahmednagar District) ग्रासले आहे. यापैकी 9505 जनावरे बरी झाली आहेत तर 5091 जनावरांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी या आजाराने बाधित जनावरे आढळली आहेत. काही जनावरांचा मृत्यूही झाला आहे. नगर जिल्ह्यात आजार वेगाने फैलावत आहे. ऑगस्टपासून या आजाराचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. सुरुवातीला प्रमाण कमी होते. नंतर मात्र वेग वाढला. आता तर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात बाधित जनावरे आढळून येत आहेत. आजार नियंत्रणासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे आजार नियंत्रणात येत असल्याचे वाटत होते. मात्र, जोरदार पावसामुळे पशुसंवर्धन विभागाच्या प्रयत्नांवर पाणी फेरले. पावसाच्या काळात जनावरांची प्रतिकार शक्ती कमी झाल्याने आजार वेगाने पसरल्याचे आता सांगण्यात येत आहे. या काळात मृत्यू संख्येतही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. आजाराचा धोका वाढत चालल्याने पशुपालक शेतकरी काळजीत पडले आहेत.
दरम्यान, बाधित जनावरांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक म्हणजे बाधित 15 हजार 597 जनावरांपैकी 9505 जनावरे या घातक आजारातून बरी झाली आहेत. जिल्ह्यात हा आजार अद्याप पूर्णपणे आटोक्यात आलेला नाही. आजाराचा फैलाव आधिक वाढू नये यासाठी जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. पशुसंवर्धन विभागाने वेगाने लसीकरण (Vaccination For Animals) केल्याने जिल्ह्यात 105 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. आतापर्यंत या आजारामुळे जिल्ह्यातील 965 जनावरांचा मृत्यू झाला आहे.
- Read : Lumpy skin disease: लम्पी लसीकरणात ‘हे’ राज्य आघाडीवर; ऑक्टोबरअखेर पर्यंत इतके आहे लक्ष्य
- Lumpy Skin Disease : बाब्बो.. ‘या’ जिल्ह्यात लम्पी स्किन 12 हजार पार; ‘इतक्या’ जनावरांनी केली आजारावर मात; जाणून घ्या..
- Lumpy skin disease: येथील २२ गावे यंदा नाही करणार दिवाळी साजरी; पहा काय आहे नेमके कारण