Lumpy Skin : लम्पी स्किन (Lumpy Skin) या घातक आजाराचा धोका सातत्याने वाढत चालला आहे. बाधित जनावरांची संख्या वाढत चालल्याने या आजाराला अटकाव करण्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. जनावरांची वाहतूक (Animal Transport) बंद करण्यात आली आहे. जनावरांचे लसीकरण, रोगनमुने गोळा करणे, बाधित जनावरांवर उपचार करणे या कामांसाठी कोणतेही सेवाशुल्क आकारू नये, असे महत्वाचे आदेश पशुसंवर्धन आयुक्तांनी दिले आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी या आजाराने बाधित जनावरे आढळली आहेत. काही जनावरांचा मृत्यूही झाला आहे. नगर जिल्ह्यात आजार वेगाने फैलावत आहे. आजार आटोक्यात आणण्यासाठी राज्यातील पशुधनाचे लसीकरण (Animal Vaccination) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जनावरांचे बाजार बंद केले आहेत. जिल्ह्यात गोजातीय प्रजातींची बाधित असलेली कोणतीही जिवंत किंवा मृत गुरे व म्हशी गोजातीय प्रजातींच्या कोणत्याही बाधित झालेल्या प्राण्याच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्याच्या निवाऱ्यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य किंवा असे प्राणी नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी मनाई करण्यात आली आहे.
Lumpy Skin : बाब्बो.. आता ‘या’ घातक आजाराने जनावरे हैराण; राज्य सरकारने तातडीने घेतला ‘हा’ निर्णय
दरम्यान, खासगी पशुवैद्यकिय व्यावसायिक लम्पी आजाराच्या उपचारावर शेतकऱ्यांची लूट करत असून अवाजवी खर्च करण्यास भाग पाडत आहेत. या बाबतीत शेतकऱ्यांचे शोषण होऊ नये तसेच त्यांच्या तक्रारींचे निवारण व्हायला हवे, असे राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत सांगितले होते.