मुंबई – इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 चा 12 वा सामना मुंबईतील DY पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात खेळला गेला. लखनौ सुपर जायंट्सने त्यांचा सलग दुसरा सामना जिंकला पण कर्णधार केएल राहुल(K.L.Rahul) एका गोष्टीने खूप नाराज दिसत होता. खरेतर, लखनौ सुपर जायंट्सने पाच षटकांत 27 धावा होईपर्यंत तीन विकेट गमावल्या होत्या. हे संघासाठी चांगले नसून आम्हाला त्यावर काम करावे लागेल, असे राहुलने सामन्यानंतर सांगितले.
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 12 धावांनी विजय नोंदवल्यानंतर राहुल म्हणाला की, “आम्ही स्वतःला सामना जिंकण्याची संधी दिली आहे, ही चांगली गोष्ट आहे. सुरुवातीला पॉवरप्लेमध्ये तीन विकेट्स गमावणे चांगले नसले तरी एक फलंदाज म्हणून आपल्याला ते शिकावे लागेल. आवेश खानने शानदार गोलंदाजी करत चार विकेट घेतल्या ज्यामुळे त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ मिळाला. राहुल म्हणाला की, ‘गेल्या तीन सामन्यांत गोलंदाजी चांगली झाली आहे.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
आवेश खान म्हणाला की, ‘संघाला विकेट देण्याचा प्रयत्न होता कारण संघाला तेच हवे होते. मला पॉवरप्ले आणि शेवटच्या षटकात विकेट घ्यायच्या आहेत. पॉवरप्लेमध्ये मला दोन षटके मिळाली ज्यात मी डॉट टाकण्याचा प्रयत्न केला. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसननेही लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांच्या कामगिरीचे कौतुक केले. तो म्हणाला की, ‘गेल्या सामन्यापेक्षा आमची कामगिरी खूपच चांगली होती. पॉवरप्ले गोलंदाजी चांगली होती, तीन बळी घेतले. दीपक हुडा आणि लोकेश राहुलची भागीदारी तोडली असती तर बरे झाले असते. त्यामुळे त्यांनी 170 धावांपर्यंत मजल मारली. ‘त्याची गोलंदाजी चांगली होती. आम्ही काही भागीदारी केली असती तर फरक पडू शकला असता असं तो म्हणाला.