Virat Kohli Gautam Gambhir Fight : लखनऊ आणि आरसीबी यांच्यात सोमवारी झालेल्या सामन्यात विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार (Virat Kohli Gautam Gambhir Fight) वादावादी झाली. वाद इतका वाढला की दोन्ही संघाच्या खेळाडूंना हस्तक्षेप करावा लागला. मैदानावर कोहली आणि गंभीरमध्ये अशी शाब्दिक वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही.
विराट कोहली आपल्या आक्रमकतेमुळे अनेकदा वादात सापडला आहे. सोमवारी झालेल्या वादानंतर विराट कोहलीचे जुने वाद पुन्हा चर्चेत आले आहेत. गौतम गंभीरसोबत झालेल्या वादानंतर लोक कोहलीवर खूप टीका करत आहेत. आयपीएलच्या इतिहासातील कोहलीचे मोठे वाद जाणून घेऊ या..
गंभीरबरोबर वाद
2013 मध्येही दोघांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) कर्णधार होता. त्याच वेळी विराट आरसीबीचा कर्णधार होता. कोहली आऊट झाल्यानंतर मैदानाबाहेर जात होता, त्यानंतर गौतम गंभीरसोबत बाचाबाची झाली. नंतर पंचांना हस्तक्षेप करावा लागला.
डेव्हिड वॉर्नरशी संघर्ष
2016 मध्ये हैदराबादचा डेव्हिड वॉर्नर आणि आरसीबीचा कर्णधार विराट कोहली यांच्यात वाद झाला होता. मैदानावरच दोघांमध्ये बराच वेळ वादावादी झाली. नंतर दोघांनाही दंड ठोठावण्यात आला.
गेलला संघातून वगळणे
आयपीएल 2012 हंगामात आरसीबीच्या ख्रिस गेलला पहिल्या काही सामन्यांसाठी संघातून वगळण्यात आले होते, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. चाहत्यांनी कोहलीवर जोरदार टीका केली. अखेरीस गेलचा संघात समावेश करण्यात आला आणि त्याने 15 सामन्यांमध्ये 733 धावा केल्या, ज्यात पुणे वॉरियर्स इंडिया विरुद्ध विक्रमी 175 धावा केल्या होत्या.
संघाची खराब कामगिरी
कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि शिमरॉन हेटमायर सारखे स्टार खेळाडू असूनही 2019 मध्ये आरसीबीचा हंगाम खराब होता. गुणतालिकेत ते तळाशी राहिले. अशा परिस्थितीत संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. यासोबतच कोहलीच्या कर्णधारपदावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.