LPG Subsidy : लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्रातील (Lok Sabha Election) मोदी सरकारने (LPG Subsidy) देशातील महिला, शेतकरी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. केंद्र सरकारने देशभरातील दीड कोटी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना महागाई भत्त्यात (DA Hike) चार टक्के वाढ दिली आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एक दिवस आधीच पीएम उज्ज्वला गॅस योजनेच्या (Ujjwala Yojana) मुदतीत एक वर्षाची वाढ केली आहे. म्हणजेच लाभार्थ्यांना आणखी वर्षभर प्रति सिलिंडर 300 रुपये अनुदान मिळत राहिल.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. 2024-25 साठी कच्च्या तागाची किमान आधारभूत किंमत 285 रुपयांनी वाढविण्यात आली. यामुळे आता कच्च्या तागाची किंमत 5 हजार 335 रुपये प्रति क्विंटल झाली आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारित सुमारे 48 लाख कर्मचारी काम करतात तर 68 लाख इतकी निवृत्तीवेतनधारकांची संख्या आहे. सरकारने महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदाक कर्मचारी आणि पेन्शनर्सना होणार आहे.
LPG Price । महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या नवीनतम दर
LPG Subsidy
सरकारने डीएमध्ये 4 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता त्यांच्या मूळ वेतनाच्या 50 टक्के झाल आहे. इतकेच नाही तर महागाई भत्ता 1 जानेवारी 2024 पासून लागू होईल त्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांचा फरकही कर्मचारी आणि पेन्शनर्स लोकांना मिळणार आहे.
यासह केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम उज्ज्वला गॅस योजनेच्या कालावधीत 31 मार्च 2025 पर्यंत वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या एक दिवस आधीच हा निर्णय घेण्यात आला. या योजनेंतर्गत महिला लाभार्थ्यांना एका वर्षात 12 अनुदानित एलपीजी गॅस सिलिंडर मिळतात. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडरवर 300 रुपये अनुदान मिळते.
LPG Subsidy
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना मे 2016 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेत आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांतील महिलांना एलपीजी सिलिंडर मिळतात. 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत देशभरात 9.67 कोटी गॅस कनेक्शन वितरीत करण्यात आले. मागील वर्षात 2023-24 ते 2025-26 या तीन वर्षात 75 लाख एलपीजी कनेक्शन देण्यासाठी या योजनेच्या विस्तारीकरणाला मंजुरी देण्यात आली होती.