LPG Price Hike: देशात मागच्या काही दिवसांपासून महागाईत वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडताना दिसत आहे.
यातच आता मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा महागाईत वाढ झाली असून एलपीजी सिलिंडरच्या किमतीमध्ये 50 रुपयांनी वाढ झाली आहे.
यामुळे आता देशाची राजधानी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 1103 रुपयांनी वाढली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी होणारी वाढ होळीपूर्वी सर्वसामान्यांना मोठा धक्का मानला जातो.
एलपीजीचे दर वाढले
बुधवारी 1 मार्च रोजी सकाळी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. 14.2 किलोच्या घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता एलपीजी सिलेंडर 1103 रुपयांचा झाला आहे. वाढलेले दर आजपासून लागू झाले आहेत.
व्यावसायिक सिलेंडरही महागले
होळीपूर्वीच महागाईचा बॉम्ब फुटला आहे. घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरबरोबरच घरगुती व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही वाढ झाली आहे. त्याची किंमत तब्बल 350.50 रुपयांनी वाढली आहे. 350.50 रुपयांनी महागल्यानंतर राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 2119.50 रुपये प्रति सिलेंडरवर आली आहे.
चार महानगरांमध्ये घरगुती एलपीजी सिलिंडरच्या नवीन किमती
दिल्लीत घरगुती एलपीजीची किंमत 1053 रुपयांवरून 1103 रुपयांपर्यंत वाढली आहे.
मुंबईत घरगुती एलपीजीची किंमत 1052.50 रुपयांवरून 1102.50 रुपये प्रति सिलिंडर झाली आहे.
कोलकातामध्ये घरगुती एलपीजीची किंमत 1079 रुपयांवरून 1129 रुपयांपर्यंत वाढली आहे.
चेन्नईमध्ये घरगुती एलपीजीची किंमत 1068.50 रुपयांवरून 118.50 रुपयांपर्यंत वाढली आहे.