LPG Price । महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या नवीनतम दर

LPG Price । महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. कारण महिन्याच्या पहिल्या दिवशी सरकारने एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर आर्थिक ताण येऊ शकतो.

हे लक्षात घ्या की, आज एलपीजीच्या दरांमध्ये ही वाढ मुंबईसह अहमदाबाद, मेरठ, दिल्ली, जयपूर, इंदूर, लखनौ, आग्रा या ठिकाणी झाली आहे. पण केवळ 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढले असून मागील ऑगस्टपासून 14.2 किलो घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर ग्राहकांना दिलेला दिलासा कायम आहे. यात कोणताही बदल झाला नाही.

जाणून घ्या सिलिंडरचे नवीन दर

नवीन दरानुसार, आज दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर १७६९.५० रुपयांऐवजी १७९५ रुपयांना मिलेल. तर कोलकातामध्ये या सिलेंडरची किंमत आता 1887 रुपयांऐवजी 1911 रुपये इतकी झाली आहे. मुंबईत व्यावसायिक सिलेंडरचा दर आता १७४९ रुपये झाला आहे. तर चेन्नईत या सिलेंडरची किंमत १९६० रुपये इतकी झाली आहे.

तर आजपासून आग्रामध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 1817.5 रुपयांऐवजी 1843 रुपयांना मिळणार आहे. जयपूरमध्ये आता 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 1818 रुपये झाला आहे. लखनऊमध्ये तो आता 1883 रुपयांऐवजी 1909 रुपये इतका झाला आहे. अहमदाबादमध्ये तो 11816 रुपये झाला असून आजपासून हा सिलिंडर इंदूरमध्ये 1901 रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी हा दर 1876 रुपये इतके होते.

घरगुती सिलिंडरचे दर 1 मार्च 2024: घरगुती LPG सिलिंडरची किंमत दिल्लीत 903 रुपये आणि कोलकात्यात 929 रुपये आहे. आज 1 फेब्रुवारी रोजी मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 918.50 रुपये आहे. आम्ही तुम्हाला सांगूया की घरगुती सिलिंडरच्या किमती 30 ऑगस्ट 2023 रोजी शेवटचा बदलण्यात आल्या होत्या. 1 मार्च 2023 रोजी दिल्लीत एलपीजीचा दर प्रति सिलिंडर 1103 रुपये होता. यानंतर ते एकाच वेळी 200 रुपयांनी स्वस्त करण्यात आले.

Leave a Comment