LPG Cylinder : सर्वसामान्यांना मोठा दिलासा! एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा घट

LPG Cylinder : राज्यात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय नेते ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. अशातच सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा घट झाली आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती.

कमी झाल्यास सिलिंडरच्या किमती

सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आजपासून देशातील वेगवेगळ्या शहरांत एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 19 रुपयांपर्यंत कपात केली आहे. पण या कपातीचा लाभ फक्त 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरवरच मिळेल. यावेळीही घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल केला नाही.

जाणून घ्या शहरातील किमती

ताज्या कपातीनंतर दिल्लीत 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 1,745.50 रुपयांवर आली असून त्याचप्रमाणे कोलकातामध्ये आजपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 1,859 रुपयांना उपलब्ध होईल. या मोठ्या सिलेंडरसाठी मुंबईकरांना आता 1,698.50 रुपये मोजावे लागतील. चेन्नईमध्ये त्याची किंमत आता 1,911 रुपये असणार आहे.

मतदानाचे दोन टप्पे पूर्ण

देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ही कपात केली आहे. मागील महिन्यात लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे. दोन टप्प्यात आतापर्यंत मतदान झाले असून मतदानाचे अजून पाच टप्पे बाकी आहेत. मतदानाचा अंतिम टप्पा 1 जून रोजी होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी लोकसभा निवडणुका 2024 चे निकाल जाहीर होणार आहेत.

मागील महिन्यातील कपात

मागील महिन्यातही एलपीजी सिलिंडरच्या किमतीत अनेक कपात केली होती. मागील महिन्याच्या पहिल्या तारखेपासून म्हणजेच १ एप्रिलपासून १९ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत ३५ रुपयांनी कमी केली होती. त्याआधी सलग तीन महिने व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत वाढ होत होती.

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या बाबतीत सांगायचे झाले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला दिनानिमित्त एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली होती. पण त्याच्या एक दिवस आधी म्हणजे ७ मार्चला मोदी सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी केल्या होत्या. त्यानंतर मंत्रिमंडळाने 31 मार्च 2025 पर्यंत पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 300 रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली. पण 14 किलोच्या सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.

Leave a Comment