मुंबई : सर्वसामान्यांना आज (शनिवारी) महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात (LPG Cylinder Price Increases) 50 रुपयांनी वाढ झाली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरची वाढलेली किंमत आजपासून देशभरात लागू करण्यात आली आहे. याआधी 22 मार्च रोजी घरगुती LPG ची किंमत प्रति सिलेंडर 50 रुपयांनी वाढवण्यात आली होती, त्यानंतर दिल्लीत अनुदानित 14.2 kg LPG सिलेंडरची किंमत 949.50 रुपयांवर पोहोचली होती. आज किंमत वाढवल्यानंतर, दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत आता 999.50 रुपयांवर गेली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या कार्यकाळात कधी दिलासा मिळणार, असा प्रश्न सामान्य नागरीकांना पडला आहे.
- Subsidy On Drones: ड्रोनसाठी 100% पर्यंत अनुदान; पहा शेतकऱ्यांना किती मिळणार आहे अर्थसाह्य
- PLEDGE LOAN SCHEME: शेतमाल तारण देऊन मिळणार कर्ज..! पहा कसा अन कुठे करायचा अर्ज
- China Politics: आणि म्हणून जीनिपिंग भडकले; ‘त्यांना’ दिलाय गंभीर इशारा
पेट्रोलियम उद्योगाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये एलपीजीचा वापर मासिक आधारावर 9.1 टक्क्यांनी घसरून 2.2 दशलक्ष टन झाला, जो एप्रिल 2021 च्या तुलनेत 5.1 टक्क्यांनी वाढला आहे. मार्चपूर्वी घरगुती एलपीजीच्या (Domestic LPG Cylinder) किमतीत गेल्या वर्षी ६ ऑक्टोबरला बदल करण्यात आला होता. हे लक्षात घेण्यासारखे आहे की 1 मे रोजी सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी (Business LPG Rate) सिलिंडरच्या किंमतीतही वाढ केली होती. व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 102.50 रुपयांनी महागला आहे. नवी किंमत लागू झाल्यानंतर दिल्लीत (Delhi LPG Rate) 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1 मे पासून 2253 रुपयांवरून 2355.50 रुपयांपर्यंत वाढली आहे. 1 मे रोजी जेट इंधनही महागले होते. दिल्लीत एअर टर्बाइन इंधनाची (Air Turbine Fuel price) किंमत 116851.46 रुपये प्रति किलोलीटर झाली आहे. यापूर्वी 16 एप्रिल रोजी एटीएफच्या किमतीत वाढ करण्यात आली होती.
Agriculture News: ‘त्या’ शेतकऱ्यांना मिळणार 1500 रुपये; पहा काय निर्णय घेतलाय पंजाब सरकारने https://t.co/O5YvEG8yjs
— Krushirang (@krushirang) May 7, 2022